Navpancham rajyog 2023 : चालू वर्षाचा शेवटचा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं बराच घडामोडींचा ठरणार आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपलं वास्तव्य स्थान बदलणार आहेत. सूर्य, बुध, मंगळ, शुक्र आणि गुरूचा यात समावेश आहे. या राशी बदलामुळं अनेक राजयोग तयार होत आहेत.
पुढच्या महिन्यात आदित्य मंगळ आणि बुधादित्य राजयोग तयार होणार आहेत. डिसेंबरच्या शेवटी गजलक्ष्मी राजयोग जुळून येत आहे. तर, सूर्य आणि गुरूचा नवपंचम योग तयार होत आहे. या नवपंचम राजयोगामुळं मेष आणि सिंह राशीसह ५ राशींचं नशीब रातोरात पालटणार आहे. वर्षाचे शेवटचे दिवस या राशींसाठी खूपच शुभ फलदायी ठरणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…
नवपंचम राजयोगामुळं सरत्या वर्षाचा शेवटचा महिना मेष राशीच्या जातकांसाठी सुखसमृद्धी वाढवणारा ठरणार आहे. हातात घेतलेलं प्रत्येक काम यशस्वी होईल. कामातील सर्व अडथळे दूर होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. घर किंवा जमीन खरेदीचा योग आहे. धनसंपत्तीत वृद्धी होईल. मुलांच्या बाबतीत निश्चिंत व्हाल. शुभवार्ता मिळू शकते.
सिंह राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना आत्यंतिक शुभ ठरणार आहे. वैवाहिक आयुष्य सुखाचं होईल. सामाजिक पत वाढेल. लोकप्रियता वाढेल. जोडीदाराची भक्कम साथ मिळेल. घरामध्ये शुभ कार्य निघेल. नोकरी करत असाल तर प्रमोशनचा योग आहे. तुमच्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक होईल.
कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना भाग्ययोग घेऊन आलाय. आयुष्य आनंदानं भरून जाईल. घरातील वातावरण संवादी आणि उत्साही राहील. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. न्यायालयीन प्रकरणं सुरू असतील तर निकाल तुमच्या बाजूनं लागेल. या महिन्यात तुमचे सर्व निर्णय योग्य ठरतील. करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे.
तूळ राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना हा एखाद्या वरदानासारखा असेल. आनंदवार्ता कानी पडेल. कष्टाचं गोड फळ मिळेल. तुमच्या प्रत्येक कामात घवघवीत यश मिळेल. डिसेंबर महिन्यात तुम्हाला पैशाची चणचण भासणार नाही. संपत्तीमध्ये वाढ होईल.
कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबीयांची आणि मित्रमंडळींची साथ मिळेल. या सहकार्यामुळं सर्व कामं यशस्वी होतील. प्रेमात असाल तर प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. नव्या नोकरीची संधी चालून येईल. व्यवसायात नफा होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. त्यातून लाभ होईल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)