आज मंगळवार १८ मे २०२४ रोजी निर्जला एकादशी साजरी केली जात आहे. शिवाय आज चंद्र अहोरात्र तूळ राशीतून आणि स्वाती नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. तसेच येत्या काळात इतरही काही ग्रह-नक्षत्रांमध्ये हालचाली दिसून येणार आहेत. ग्रह-नक्षत्र एका ठराविक काळानंतर राशी आणि नक्षत्र बदलत असतात. याच नियमानुसार राहू लवकरच नक्षत्र परिवर्तन करणार आहे. जोतिष्यशास्त्रानुसार नऊ ग्रह राशींवर मोठा प्रभाव पाडत असतात. त्यांच्या स्थान बदलाने राशींचे भविष्य ठरत असते. त्यामुळेच राहूच्या नक्षत्र बदलानेसुद्धा राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक बदल दिसून येणार आहेत.
ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना प्रचंड महत्व आहे. प्रत्येक ग्रह राशीचक्रातील एखाद्या राशीचा स्वामी असतो. त्यानुसार या राशींमध्ये त्यांचे गुणधर्म पाहायला मिळतात. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट गुणधर्माचे प्रतिनिधित्व करत असते. त्यामध्ये राहुचासुद्धा समावेश होतो. राहूला मायावी ग्रह म्हणून संबोधले जाते. कारण एखाद्या राशीचे आयुष्य पालटण्याची क्षमता त्यात असते. राहूच्या राशी किंवा नक्षत्र परिवर्तनाने या राशींवर प्रचंड प्रभाव पडलेला पाहायला मिळतो. महत्वाचे म्हणजे राहू तब्बल दीड वर्षातून एकदाच राशीपरिवर्तन करत असतो. सध्या राहू मीन राशीत विराजमान आहे. येत्या ८ जुलैला राहू रेवती नक्षत्रातून उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचा परिणाम काही राशींवर अत्यंत सकारात्मक असणार आहे. तब्बल २२० दिवस म्हणजेच जवळपास ८ महिन्यांचा हा कालावधी असणार आहे. पाहूया या लकी राशी कोणत्या आहेत.
राशीचक्रातील दुसऱ्या क्रमांकांची राशी म्हणजे वृषभ होय. राहूच्या नक्षत्र परिवर्तनाचा मोठा लाभ वृषभ राशीला होणार आहे. या ८ महिन्यांच्या कालावधीत तुमच्या करिअरमध्ये चांगला सकारात्मक बदल पाहायला मिळेल. कमी वेळेत जास्त प्रगती होईल. शिवाय याकाळात तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होतील. हातात आल्याने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली आर्थिक कामे पूर्णत्वास जातील. कार्यक्षेत्रात तुमची जबाबदारी तुम्ही उत्तमरीत्या पार पाडाल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमची लव्ह लाईफ आणखी बहरेल. विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि प्रेम वाढेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल.
तूळ राशीलासुद्धा राहूच्या नक्षत्र बदलाचा विशेष फायदा मिळणार आहे. याकाळात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक घटना घडलेल्या पाहायला मिळतील. त्यामुळे मन उत्साही राहील. उद्योग-व्यवसाय असणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होईल. विरोधकांचे डाव उधळून लावण्यात यशस्वी व्हाल. त्यातून आत्मविश्वास वाढेल. कामानिमित्त प्रवासाचे योग जुळून येतील. त्यातूनही आर्थिक लाभ होईल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जोडीदारासोबत जास्तीत-जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल.
वृषभ आणि तूळप्रमाणे वृश्चिक राशीलासुद्धा राहू नक्षत्र परिवर्तनाचा विशेष लाभ मिळणार आहे. याकाळात कार्यक्षेत्रात तुमचा नावलौकिक वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडून लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तसेच घरातील वातावरण आनंदी असणार आहे. घरात महागड्या वस्तूंची खरेदी होईल. ऐषारामी आयुष्य जगण्याकडे कल राहील. खर्च वाढला तरी मिळकतसुद्धा तितकीच असणार आहे. त्यामुळे पैशांची कमतरता भासणार नाही. मनाप्रमाणे गोष्टी घडत असल्याने मन आनंदी आणि उत्साही असेल.
संबंधित बातम्या