राहू-केतू गोचर 2025 : प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशी-नक्षत्र बदलतात. हे राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन राशींवर परिणामी ठरते. राशीचक्रातील १२ राशींवर ग्रहांच्या बदलाचा परिणाम होतो. काही राशीच्या लोकांवर शुभ परिणाम होतो तर काही राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होतो.
नवीन वर्ष २०२५ सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. २०२५ मध्ये ग्रह-नक्षत्रांची स्थिती अत्यंत खास असणार आहे. नवीन वर्षात अनेक ग्रह-नक्षत्रे राशी बदलतील. ज्यात राहू-केतू या मायावी ग्रहाचाही समावेश आहे. वर्ष २०२५ मध्ये राहू मीन राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत जाईल आणि केतू कन्या राशीतून सिंह राशीत जाईल. राहू-केतूच्या राशी परिवर्तनाचा मेष ते मीन राशीवर परिणाम होईल. परंतु राहू-केतूचे संक्रमण काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. जाणून घ्या कोणत्या राशींना होईल राहू-केतू संक्रमणाचा फायदा.
२०२५ मध्ये राहू-केतू चे संक्रमण कधी होणार- पंचांगानुसार १८ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी राहू-केतू संक्रमण होईल. राहू-केतू कोणत्याही राशीत सुमारे १८ महिने राहतात.
राहू-केतू चे संक्रमण मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ परिणाम प्रदान करेल. या दरम्यान तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरीच्या नवीन संधीही लाभू शकतात. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी राहू-केतू चे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. आपल्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक दृष्ट्या तुमची परिस्थिती चांगली राहील. आर्थिक बचत आणि धनसंचय करण्यातही यशस्वी व्हाल.
मकर राशीच्या लोकांसाठी राहू-केतू चे संक्रमण अत्यंत शुभ ठरणार आहे. मकर राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. धार्मिक कार्यात रस वाटेल. नोकरीत पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नफा वाढेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे, ही माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)