प्रत्येक ग्रहाचे राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ प्रभावी ठरते. राशीचक्रातील १२ राशींवर तसेच देश आणि जगासह मानवी जीवनावर ग्रहांच्या संक्रमणाचा प्रभाव पडतो.
ज्योतिषशास्त्रात राहू-केतू ला छाया ग्रह मानले जाते. राहुच्या राशीबदलाचा परिणाम देश आणि जगासह मानवी जीवनावर होईल. राहु नेहमी वक्री गतीने फिरतो म्हणजेच कोणत्याही राशीत पुढे जाण्याऐवजी राहु मागे सरकतो.
१० नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजून ३१ मिनिटांनी राहूने नक्षत्र बदलले आहे. राहूने उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील तिसऱ्या पदातून दुसऱ्या पदात प्रवेश केला आहे. राहू १० जानेवारी २०२५ पर्यंत या नक्षत्रात राहील आणि त्यानंतर तो उत्तराभाद्रपद नक्षत्रातून रेवती नक्षत्रात प्रवेश करेल.
उत्तराभाद्रपद हे २७ नक्षत्रांपैकी २६ वे नक्षत्र आहे, जे मीन राशीच्या अंतर्गत येतो. उत्तरा-भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात राहुचा प्रवेश अनेक राशींवर परिणाम करत आहे. राहूचे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी राहूचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी राहूचे नक्षत्र संक्रमण शुभ ठरणार आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. पैसेही जुन्या मार्गाने येतील. दांपत्य जीवन सुखमय राहील. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कन्या राशीच्या लोकांना राहूच्या प्रभावामुळे शुभ परिणाम प्राप्त होतील. व्यापाऱ्यांसाठी लाभदायक काळ निर्माण होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. प्रवासात फायदा होईल. विकासाच्या संधी उपलब्ध होतील.
राहुचे परिवर्तन तुळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी चांगली स्थिती राहील. नवीन कामाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. काही जातकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
धनु राशीच्या लोकांसाठी राहूची स्थिती लाभदायक ठरेल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. घरात कोणतेही शुभ किंवा धार्मिक कार्य होऊ शकते. प्रेम जीवनामध्ये सुधारणा होईल. अपघाती आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)