Rahu Gochar News : वैदिक शास्त्रानुसार अवकाशातील नऊ ग्रह राशीचक्रात बदल घडवून आणतात. या नवग्रहांचे प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. त्यानुसार राहू ग्रहाला छाया ग्रह किंवा मायावी ग्रह असे संबोधले जाते. ग्रह एका ठराविक कालावधीत राशी परिवर्तन करत असतात. या नियमानुसार राहू तब्बल १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. शिवाय राहू ठराविक वेळेत नक्षत्र परिवर्तनसुद्धा करतात. ग्रहांच्या या राशी आणि नक्षत्र परिवर्तनांतून विविध योग जुळून येतात. या योगांचा फायदा राशीचक्रातील राशींना मिळत असतो.
ज्योतिषीय अभ्यासानुसार, राहू ग्रह सध्या रेवती नक्षत्रात विराजमान आहे. परंतु अवघ्या तीन दिवसांत म्हणजेच ८ जुलै रोजी राहू उत्तरभाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहे. ८ जुलै रोजी पहाटे ४ वाजून ११ मिनिटांनी राहू रेवती नक्षत्र सोडून उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहूच्या नक्षत्र परिवर्तनाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. तर काही राशी अशा आहेत ज्यांचे राहू नक्षत्र परिवर्तनाने नशीबच पालटणार आहे. पाहूया या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
राहूच्या नक्षत्र परिवर्तनाचा शुभ प्रभाव वृषभ राशीच्या लोकांवर पडणार आहे. राहू वृषभ राशीच्या धन या भावात गोचर करत असल्याने, या राशीच्या लोकांना प्रचंड धनलाभ होणार आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेले एखादे महत्वाचे कार्य याकाळात पूर्ण होईल. सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांना हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. राहू नक्षत्र परिवर्तनात तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद दूर होऊन नातेसंबंध सुधारतील. याकाळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड लाभ मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती भक्कम राहील.
राहूचे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे. सध्या शनिदेव या राशीच्या दुसऱ्या घरात विराजमान आहेत. शिवाय राहू गोचर या राशीच्या धन भावात होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसोबत सतत धनलाभाचे प्रसंग घडतील. कमाईचे नवे मार्ग यांच्यासाठी खुले होतील. हातात पैसा आल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. घरात भौतिक वस्तूंची वाढ होईल. याकाळात तुमचे परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. शिवाय कामानिमित्त अनेक ठिकाणी प्रवास करावा लागेल. या प्रवासातून आर्थिक लाभ होण्याचा योग आहे.
कर्क राशीच्या लोकांना राहू गोचरचा पुरेपूर फायदा होणार आहे. राहू कर्क राशीच्या आठव्या घरात भ्रमण करत आहे. याकाळात या लोकांच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. आयुष्यात एक सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त होईल. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. कामानिमित्त परदेश वारी घडून येईल. आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. व्यावसायिकांना याकाळात केलेल्या गुंतवणुकीतून प्रचंड नफा मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनमोकळा संवाद होऊन एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम आणखी वाढेल.
संबंधित बातम्या