Rahu Favourable Zodiac Signs : ज्योतिषशास्त्रात राहुला मायावी ग्रह मानले जाते. राहू हा छाया ग्रह आहे. त्यामुळे राहु हा अशुभ ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात राहु संबंधी काही उपाय दिले आहेत. परंतू छाया ग्रह असण्याचा अर्थ असा नाही की राहु नेहमीच अशुभ परिणाम देईल. राहु हा काही परिस्थितींमध्ये शुभ आणि काही परिस्थितींमध्ये अशुभ परिणाम देतो. काहीवेळा राहू असे सकारात्मक परिणाम देतो ज्याची कल्पना करणे कठीण आहे. जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या राशीला राहू शुभ फळ देतो-
ज्योतिष शास्त्रामध्ये राहूला अनपेक्षित घटनांचे कारक असे म्हटले आहे. राहु हा जीवनातील अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक असल्याचे सांगितले जाते. राहु हा अभिमान मोडणारा ग्रह असल्याचेही सांगितले जाते. आयुष्यात अचानक घडणाऱ्या कोणत्याही चांगल्या किंवा वाईट घटनेला राहु जबाबदार असल्याचे मानले जाते. जर कुंडलीत राहुचे स्थान शुभ किंवा श्रेष्ठ असेल तर राहू शुभ फल प्रदान करतो. राहुची स्थिती शुभ नसल्यास वैयक्तिक नातेसंबंधांसह आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात.
ज्योतिष शास्त्र सांगते की राहु प्रत्येक राशीवर आपली वक्री दृष्टी म्हणजेच वाईट नजर ठेवतो, परंतू असे नाही. राहु काही राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणाराही ठरतो. जाणून घ्या या कोणत्या राशी आहे ज्या राहु ग्रहाला प्रिय आहेत-
राहुला सिंह राशी आवडतात. राहु जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा खूप शुभ फल देतो असे म्हटले जाते. सिंह राशीच्या लोकांना राहु अचानक आर्थिक लाभ देतो. यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक मोठे बदलही होतात. राहूच्या कृपेने या लोकांना सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात.
वृश्चिक ही देखील राहूच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. असे म्हटले जाते की, राहुच्या प्रभावामुळे या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगले यश मिळवतात. असे लोक व्यवसायात तसेच नोकरीत उच्च पद प्राप्त करतात. राहूच्या कृपेने या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या