Personality Test : आपल्या संस्कृतीत जोतिषशास्त्र (Astrology), अंकशास्त्र (Numerology), हस्तरेषाशास्त्र (Palmistry) आणि सामुद्रिकशास्त्र अशा वेगवेगळ्या शास्त्रांना विशेष महत्व आहे. राशी आणि मूलांक पाहूनच नव्हे तर हस्तरेषा शास्त्र आणि सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीच्या हातावरून, पायावरून, चेहऱ्याच्या, कानाच्या आकारावरून सुद्धा तुमचे भविष्य सांगितले जाते. आज आपण कानाच्या आकारावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व काय सांगते ते पाहणार आहोत. वेगवेगळ्या कानाचे आकार असणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या स्वभावांचे असतात.
सामुद्रिक शास्त्रानुसार कानाचा आकार मोठा असणारे लोक शांत आणि समाधानी स्वभावाचे असतात. त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. असे लोक सहजासहजी हार मानत नाहीत. तसेच कधीच नकारात्मक विचार करत नाहीत. मोठे कान असणाऱ्या व्यक्ती असंख्य लोकांच्या समोर आपले मत ठामपणे मांडू शकतात. संकटांच्या काळात असे लोक कधीच हात सोडत नाहीत. विशेष म्हणजे अशा लोकांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही.
गोलाकार कान असणारे लोक व्यवहारिक मतांचे असतात. असे लोक कधीच भावनेच्या भरात कोणतीच गोष्ट करत नाहीत. गोलाकार कान असणारे लोक नेहमी तर्कवितर्क लावून आपली मते व्यक्त करतात. एखाद्या गोष्टीत अपयश मिळाले तर त्यात खचून न जाता नव्यानं उभे राहण्याची ताकत या लोकांच्यात प्रचंड असते.
कानाचा आकार लहान असणारे लोक लाजऱ्या स्वभावाचे असतात. असे लोक फक्त आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे पसंत करतात. या लोकांना कमी बोलायला आवडते. परंतु गरजेच्या ठिकाणी मोजक्या शब्दात प्रभावी बोलणे यांना उत्तम प्रकारे जमते.
ज्या लोकांच्या कानाचा आकार 'डब्ल्यू' सारखा असतो त्यांना टोकदार कान म्हटले जाते. असे लोक कलाकारवृत्तीचे असतात. या लोकांना मोठमोठी स्वप्ने पाहणे आवडते. त्यांना विविध कल्पना सुचत असतात. हे लोक आपल्या कामात प्रचंड जिद्दी असतात.
संबंधित बातम्या