Purnima : पौष पौर्णिमा आणि महाकुंभला बनतोय शुभ योग; या ४ राशींना मिळेल अपार यश, उत्पन्न होणार दुप्पट
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Purnima : पौष पौर्णिमा आणि महाकुंभला बनतोय शुभ योग; या ४ राशींना मिळेल अपार यश, उत्पन्न होणार दुप्पट

Purnima : पौष पौर्णिमा आणि महाकुंभला बनतोय शुभ योग; या ४ राशींना मिळेल अपार यश, उत्पन्न होणार दुप्पट

Jan 13, 2025 11:29 AM IST

Paush Purnima In Marathi : यंदा पौष पौर्णिमा १३ जानेवारी २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. यावर्षी पौष पौर्णिमेला एक अतिशय सुंदर योग तयार होत आहे, जो विविध राशींसाठी लाभदायक ठरेल. यंदा पौष पौर्णिमेनिमित्त रवियोग आणि भद्रवास योगाची निर्मिती होत आहे. या राशींना अपार लाभ होईल.

पौष पौर्णिमा २०२५ लकी राशी
पौष पौर्णिमा २०२५ लकी राशी

यंदा पौष पौर्णिमा सोमवार १३ जानेवारी २०२५ रोजी साजरी केली जात आहे. पौष पौर्णिमेलाच शाकंभरी पौर्णिमाही म्हणतात. आज शाकंभरी नवरात्री समाप्त होत असून, प्रयागराज येथील महाकुंभ मेळा सुरू होत आहे. नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा यामुळे आणखी खास ठरत आहे. तसेच मकर संक्रांतीचा हा आदला दिवस असल्यामुळे आजच भोगी सणही आहे.  

या सर्व सण-उत्सव, व्रत-वैकल्यासह यावर्षी पौष पौर्णिमेला एक अतिशय सुंदर योग तयार होत आहे, जो विविध राशींसाठी लाभदायक ठरेल. यंदा पौष पौर्णिमेनिमित्त रवियोग आणि भद्रवास योगाची निर्मिती होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. जाणून घ्या मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर पौष पौर्णिमेला कोणत्या राशींना फायदा होईल. या शुभ योग-संयोगामुळे ४ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार असून, जाणून घेऊया या लकी राशीमध्ये तुमचीही राशी आहे का? 

पौष पौर्णिमेच्या योग-संयोगाचा या ४ राशीच्या लोकांना होणार अपार लाभ -

मिथुन -

पौष पौर्णिमा मिथुन राशीसाठी चांगले परिणाम घेऊन आली आहे. या राशीच्या लोकांना लाभ मिळेल. आर्थिक लाभ होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. तसेच, सूर्याचे मकर राशीत संक्रमण झाल्यानंतर आपल्या घरात शुभ कार्य पूर्ण होईल.

कर्क -

कर्क राशीच्या लोकांच्या मुलांची स्थिती चांगली राहील. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. पैशाच्या कामात मोठे यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शुभ कार्ये लाभदायक ठरतील. तुमचे वैवाहिक जीवनही चांगले राहील.

वृश्चिक -

वृश्चिक राशीच्या लोकांना महाकुंभाच्या स्नानाचा पहिला दिवस फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पौष पौर्णिमा देखील लाभदायक ठरेल. या राशीचे लोक भाग्यवान ठरतील. उत्पन्न दुप्पट होईल आणि सर्व ग्रहांची खास साथ मिळेल.

मकर -

पौष पौर्णिमा मकर राशीच्या लोकांना फायदेशीर राहील. दुसऱ्या दिवशी सूर्य मकर राशीत येणार असल्याने या राशीच्या लोकांना अपार लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे स्वत:चे काही काम जे फार दिवसांपासून रखडले होते ते होईल, ज्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेत होता. नोकरीच्या शोधात असाल तर फायदा होईल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner