Marathi Palmistry: आपल्या हातातील तीन रेषा खूप खास आहेत. कारण या रेषा तुमच्या भविष्याबद्दल खूप काही सांगतात. या रेषांच्या जोडणीमुळे धनाची पेटी नावाचे चिन्ह तयार होते. धनाची पेटी अर्थ असा की अशा व्यक्तीला पैशांची कमतरता भासणार नाही. पैसा तुमच्या हातात राहील आणि तुम्ही नेहमीच पैसे वाचवणार आहात. ते तुम्ही तुमच्या हातात बघून सहज तपासू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या रेषांची स्थिती समजून घेऊन ते सहज समजू शकता. धनाच्या पेटीत भाग्य रेषा, मेंदूरेषा असते. बुध रेषा जेव्हा भाग्यरेषा आणि मेंदूरेषा यांना छेद देते तेव्हा त्यापासून तयार होणाऱ्या त्रिकोणाला धनाची पेटी किंवा त्रिकोण असे म्हणतात.
अंगठ्याच्या बाजूच्या बोटातून मष्तिष्क रेषा बाहेर येते. त्याचवेळी भाग्यरेषा ब्रेसलेट अर्थात मनगटाच्या दिशेने येते आणि बुध रेषा सर्वात लहान बोटाच्या तळाशी असते.
हस्तरेखातज्ज्ञांच्या मते ही धनाची पेटी म्हणजेच त्रिकोण शनी रेषा, बुध रेषा आणि मस्तिष्क रेषा यांनी मिळून बनलेली असते. त्यामुळे या त्रिकोणाला धनाची पेटी असे म्हणतात. पण ही धनाची पेटी कुठूनही उघडलेली असू नये, हे महत्त्वाचे आहे. धनाची पेटी कुठूनही उघडलेली असेल तर त्या व्यक्तीकडे पैसे येतात, पण ते टिकत नाही. अशा व्यक्तीचा पैसा खर्च होतो.
जर तुमच्या धनाच्या पेटीवर एखादी चीर असेल किंवा पेटीवर किंवा पेटीमध्ये क्रॉस असेल तर अशा व्यक्तीला पैशाचा फायदा होत नाही. अशा वेळी धनाच्या पेटीला काहीच अर्थ रहात नाही. याचे कारण म्हणजे अशा व्यक्तीकडे पैसे नसतील, किंवा पैसा असला तरी तो खर्च होऊन जाईल. अशा वेळी धनाच्या पेटीला खऱ्या अर्थाने धनाची पेटी म्हटले जाणार नाही.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा दावा आम्ही करत नाही. या माहितीचा अवलंब केल्यास इच्छित परिणाम मिळतील असाही आमचा दावा नाही. सर्वसामान्यांची विषयातील रुची लक्षात घेऊनच हा लेख तयारकरण्यात आला आहे.
संबंधित बातम्या