Palmistry हस्तरेषाशास्त्रानुसार व्यक्तीच्या तळहातावर असलेल्या रेषा आणि चिन्हांचा नशिबाशी सखोल संबंध असतो. व्यक्तीच्या हाताची रेषा, चिन्ह आणि बोटांचा पोत याद्वारे प्रेम, करिअर, आरोग्यासह जीवनाच्या विविध पैलूंशी संबंधित अनेक शुभ-अशुभ घटनांचा अंदाज बांधता येतो. तळहातावरील रेषांव्यतिरिक्त मनगटाच्या रेषाही त्या व्यक्तीशी संबंधित काही खास बाबी सूचित करतात. हाताचे तळवे आणि मनगट जिथे जोडतात त्या रेषांना मणिबंध रेषा म्हणतात. मणिबंध रेषा व्यक्तीच्या वयाशी जोडलेली असते. असे मानले जाते की मणिबंध रेषा जितकी खोल आणि स्पष्ट असेल तितकी ती व्यक्ती निरोगी असते. चला तर मग जाणून घेऊया मणिबंध रेषांबद्दल काही खास गोष्टी...
मनगटाची पहिली रेषा स्वच्छ आणि सरळ असेल तर ते चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे मानले गेले आहे. ती रेषा कोणत्याही प्रकारे फाटली गेलेली नसेल किंवा दुभंगली गेलेली नसेल, तर याचा अर्थ व्यक्तीचे आरोग्य चांगले राहील असा होतो. त्याचवेळी फाटलेली किंवा दुंभगलेली आणि अस्पष्ट रेषा खराब आरोग्याचे लक्षण मानली जाते.
असेही म्हटले जाते की व्यक्तीची मणिबंध रेषा जितकी लांब असते तितके त्याचे आयुष्य जास्त असते. सामान्यत: व्यक्तीच्या मनगटावर २ ते ३ मणिबंध रेषा असतात. असे मानले जाते की ज्या लोकांच्या मनगटावर ३ मणिबंध रेषा असतात. अशा लोकांचे आरोग्य खूप चांगले असते. अशा लोकांचे जीवन सुखसोयींमध्ये व्यतीत होते. एकूण आयुष्याचा विचार केला तर, अशा व्यक्तीचे आयुष्य ७५ वर्षांच्या आसपास असल्याचे मानले जाते.
तर ज्या लोकांच्या मनगटावर २ मणिबंध रेषा असतात, अशा लोकांचे आयुष्य हे ५० वर्षापर्यंत असू शकते, असे मानले जाते.
त्याचबरोबर ४ मणिबंध रेषा असलेली व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते. मनगटावर ४ मणिबंध असलेले लोक दीर्घायुष्य जगतात असे मानले गेले आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.