Lotus Symbol on Palm: तळहातावर अनेक चिन्हे किंवा खुणा आढळतात. ही चिन्हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी फळे देतात. हस्तरेखाशास्त्रात तळहातावर तयार झालेल्या खुणा किंवा चिन्हांचे वर्णन केले आहे. समुद्रशास्त्रात तळहातावर असलेली काही चिन्हे अत्यंत शुभ आणि भाग्यवान मानली जातात. त्यापैकी एक म्हणजे कमळाचे प्रतीक. तळहातावर कमळाचे चिन्ह असल्यास काय होते आणि त्यासंबंधीचे संकेत जाणून घ्या.
तळहातावर कमळाचे चिन्ह किंवा खूण असणे शुभ असते. हे चिन्ह भगवान विष्णूचे सूचक आहे. हे चिन्ह तळहातावर असणे याला विष्णू योग म्हणतात. समुद्रशास्त्रानुसार ज्याच्या हातात कमळाचे चिन्ह असते त्याला भगवान विष्णूची कृपा असते. ते भाग्यवान आणि श्रीमंत मानले जातात. ते वैभव आणि ऐश्वर्ययांचे मालक आहेत, असे म्हटले जाते. चांगल्या वक्तृत्वाबरोबरच हे चिन्ह प्रमुख नेतृत्वाचा गुणही प्रदान करते. हे चिन्ह राजलक्ष्मी योगाचा ही एक घटक मानले जाते. तळहातावर कमळाचे चिन्ह असल्यामुळे व्यक्ती नेतृत्वात पारंगत होते असेही म्हटले गेले. ज्याच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असते अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही, असेही हस्तरेषाशास्त्रात सांगितलेले आहे.
तळहातावर कुठेही कमळाचे चिन्ह तयार होऊ शकते. हस्तरेखाशास्त्रात हे चिन्ह भाग्यवान मानले जाते. कमळाची खूण बहुतेक हृदयरेषेवर दिसते. हृदयरेषेच्या मध्यभागी किंवा शेवटी कमळाचे चिन्ह दिसू शकते.
तळहातावर असलेल्या भाग्यरेषेवरही कमळाचे चिन्ह तयार होते. हस्तरेषाशास्त्राचे जाणकार आणि ज्योतिषींच्या मते भाग्यरेषेवर कमळाचे चिन्ह तयार होणे हे यशाचे सूचक मानले गेले आहे. असे म्हटले जाते की, तळहातावर कमळाचे चिन्ह असलेले हे लोक जर गरीब घरात जन्माला आले तर ते आपल्या परिश्रमाच्या जोरावर आणि कर्माच्या जोरावर जीवनात सुख-समृद्धी प्राप्त करून घेत असतात. ते आपल्या परिस्थितीच्या चिखलातून कमळाच्या फुलासारखे चिखलाच्या वर येतात आणि स्वत:चा उद्धार करून घेतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या