Palmistry: हस्तरेषाशास्त्रात तळहाताचे वर्णन चार ते सात प्रकारे करण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तळहात असलेल्या व्यक्तींचा स्वभाव देखील वेगवेगळा असतो आणि त्यांचे गुण आणि अवगुण देखील वेगवेगळ्या प्रकारचेच असतात. ज्या व्यक्तींच्या तळहातामध्ये भाग्यरेषा गुरू पर्वत, शनी पर्वत, सूर्य पर्वत, बुध पर्वत, शुक्र पर्वत, मंगळ पर्वत किंवा चंद्र पर्वताच्या दिशेने जाते, अशा व्यक्ती भाग्यवान असतात. हस्तरेषाशास्त्रानुसार, अशा तळहाताची व्यक्ती त्या ग्रहांशी संबंधित क्षेत्रात सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक यश प्राप्त करणारी असते.
तळहातामध्ये तयार झालेली शुभचिन्हे व्यक्तीच्या समृद्धीचे संकेत देतात. त्याचप्रमाणे या पर्वतांमध्ये क्रॉस किंवा कट रेषा असतील तर त्या पर्वताशी संबंधित समस्यांनाही त्या व्यक्तीला सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, सूर्य पर्वतावर बनवलेला क्रॉस जातकांना डोळ्यांचे आजार, बीपी किंवा हाडांशी संबंधित समस्या देत असतो. शुक्र पर्वतावरील क्रॉसमुळे जातकांना लघवीशी संबंधित समस्या किंवा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या उद्भवतात.
ज्या लोकांच्या तळहातावर रेषा खूप अस्पष्ट असतील, म्हणजे रेषा स्पष्ट दिसणार नाहीत, रेषांना जाळी असतील आणि सर्व रेषा अतिशय हलक्या आणि अस्पष्ट असतील, तर अशा व्यक्तीचे आयुष्य खूप कठीण असते. प्रामुख्याने आरोग्याशी संबंधित समस्या लहानपणापासूनच त्याला घेरतील.
ज्यांच्या हातात जीवनरेषा, मेंदूरेषा, हृदयरेषा आणि भाग्यरेषा स्पष्टपणे असतील, परंतु या चार मुख्य रेषा वगळता दुसरी कोणतीही रेषा या व्यक्तीच्या हातात असत नाही. अशा व्यक्तीचे जीवन सामान्य प्रकारचे असते. त्याच प्रमाणे या व्यक्तीच्या हातात जीवनरेषा, मस्तिष्करेषा आणि हृदयरेषा असण्याची ही शक्यता आहे.
नशिबाची रेषाही अनेकदा अशा लोकांच्या तळहातात नसते. अशा व्यक्तीचे आयुष्य कमी संघर्षमय असेल, पण अशा व्यक्तीचे जीवन मात्र सामान्य असेल. अशा तळहातामध्ये भाग्यरेषा नसेल तर अशा व्यक्तीला कधीही बाह्य मदत मिळू शकणार नाही, असे हस्तरेषाशास्त्रात म्हटले गेले आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या