Swastik on palm meaning: हस्तरेषाशास्त्रात तळहातावर तयार झालेल्या खुणा किंवा चिन्हांचे वर्णन केले गेले आहे. असे म्हटले जाते की तळहाताच्या रेषा व्यक्तीच्या भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानाची माहिती देतात. या धर्तीवर तयार झालेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह म्हणजे स्वस्तिकाची खूण. तळहातावरील स्वस्तिक चिन्ह अत्यंत शुभ मानले जाते. जाणून घ्या तळहातावरील स्वस्तिक चिन्हाचे
स्वस्तिक चिन्ह कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही कोनातून पाहता येते. हस्तरेषाशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह असलेल्या व्यक्तीला राजयोगाचे सुख प्राप्त होते. या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात अतिशय लवकर आणि कमीत कमी संघर्षात यश मिळवत असतात. ते केवळ स्वतःसाठीच नशीबवान नसतात तर इतरांना आणि एकूणच समाजाला देखीव सौभाग्य देतात. त्यांना दानशूर समजले जाते आणि त्यांच्याकडून समाजाची मदत आणि सेवा केली जाते.
हस्तरेषाशास्त्रानुसार ज्या लोकांच्या भाग्यरेषेवर स्वस्तिकाचे चिन्ह असते ते लोक प्रतिभाशाली मानले जातात. अशा लोकांना आयुष्यात अनेक चांगल्या संधी मिळत असतात. शिवाय हे लोक आर्थिकदृष्ट्या प्रगत मानले जातात.
गुरु पर्वतावर स्वस्तिक चिन्ह असेल तर अशा लोकांना समाजात मानसन्मान मिळतो. समाजात अशा व्यक्तीचे नाव होते.
गुरु पर्वततळहाताच्या पहिल्या तर्जनीबोटाच्या अगदी खाली स्वस्तिक चिन्ह असेल तर ते शुभ मानले जाते. अशा लोकांचा सहवास चांगला समजला असतो. असे लोक योग्य मार्गावर असल्याचे मानले जाते.
हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्ह हे अत्यंत शुभ मानले जाते. इतरही अनेक धर्मात स्वस्तिक चिन्हाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यासाठी स्वस्तिक आवश्यक असल्याचे धार्मिक दृष्ट्या मानले गेले आहे. त्याशिवाय पूजा सुरू होत नाही. स्वस्तिक चिन्हे शुभाचे सूचक मानले जातात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्वस्तिकाचे प्रतीक भगवान विष्णूचे आसन आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे.
चंदन, कुमकुम किंवा शेंदूर लावून स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रह दोष दूर होतात, अशी मान्यता आहे. स्वस्तिक चिन्हामुळे आर्थिक लाभ होतो असेही मानले गेले आहे. घरामध्ये स्वस्तिक चिन्ह बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.