Letter A on palm of hand meaning: हस्तरेषाशास्त्रानुसार तळहातावर असलेल्या खुणा, चिन्हे व रेषा इत्यादींच्या साहाय्याने व्यक्तीचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ मोजला जातो. हस्तरेषाशास्त्राचे तज्ञ हात पाहून व्यक्तीची आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन आणि करिअर इत्यादींशी संबंधित माहिती जाणून घेतली जाते. अनेकदा हाताच्या रेषांवरून इंग्रजी अक्षरांचा आकार आपल्याला दिसतो. ही अक्षरे A ते Z पर्यंत असू शकतात. हस्तरेषाशास्त्रानुसार तळहातावरील A चे चिन्ह अत्यंत शुभ मानले जाते. ही खूण प्रत्येकाच्या हातात दिसत नाही. असे म्हटले जाते की, ज्या लोकांच्या तळहातावर A ची खूण असते ते अत्यंत भाग्यवान असतात. जाणून घ्या, तळहातावरील A चिन्ह म्हणजे काय?
हस्तरेषाशास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या तळहातावर A ची खूण असते ते भाग्यसंपन्न मानले जातात. असे लोक कुटुंबाची विशेष काळजी घेतात. ते चांगले व्यापारी बनतात.
तळहातावरील A चे चिन्ह अत्यंत शुभ असते. असे म्हटले जाते की, ज्या लोकांच्या तळहातावर अशा प्रकारचे चिन्ह असते अशा व्यक्ती स्वभावाने मैत्रीपूर्ण असतात आणि इतरांना मदत करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात. आपल्या समस्यांवर ते स्वत:च उपाय शोधतात. तळहातावर चे चिन्ह असणाऱ्या व्यक्ती आपले काम पूर्ण निष्ठेने करत असतात.
असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तींच्या तळहातावर A चिन्ह असते त्या व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेल्या असतात. आपले भवितव्य चांगले करण्यावर अशा व्यक्तींचा भर असतो. या लोकांना पैशांशी संबंधित समस्या क्वचितच येतात. या बरोबरच अशा लोकांना बुद्धिमान मानले जाते.
तळहातावर A चे चिन्ह असलेल्या व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी समर्पित असतात. त्यांचे आपल्या कुटुंबावर निरतिशय प्रेम असते. या व्यक्ती जोडीदाराच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत असतात. अशा व्यक्ती स्वत:च्या बळावर, आपल्या कार्यकतृत्वाने उच्च पदावर विराजमान होतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.