Palmistry: हस्तरेखाशास्त्रानुसार तळहातावरील रेषा व्यक्तीचे नातेसंबंध, करिअर, आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये अनेक विशेष संकेत देतात. तळहातावरील आरोग्य रेषा व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल अनेक विशेष संकेत देते. व्यक्तीच्या तळहातावरील आरोग्य रेषा लहान बोटाच्या तळापासून सुरू होते आणि अंगठ्यापर्यंत वाढू शकते. हस्तरेखाशास्त्रानुसार आरोग्य रेषा कोठेही सुरू होऊ शकते, परंतु ती तळहातावरील बुध पर्वतावर संपते. आरोग्य रेषा जर शुक्र पर्वत, जीवनरेषा, चंद्र पर्वत, भाग्य रेषा किंवा मंगळ पर्वतापासून सुरू होऊन बुध पर्वतावर पोहोचली तर तिला आरोग्य रेषा म्हणता येईल. चला तर मग जाणून घेऊ या, व्यक्तीच्या तळहातावरील आरोग्य रेषा काय दर्शवते?
असे मानले जाते की जर तळहातावरील आरोग्य रेषा जीवनरेषेशी जोडलेली नसेल तर अशा व्यक्तीचे दीर्घायुष्य असते. सुरवातीला जर आरोग्य रेषा गडद लाल रंगाची असेल तर त्या व्यक्तीला हृदयरोगाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय मध्यभागी आरोग्य रेषा लाल असेल तर व्यक्तीच्या आरोग्यावर आणि जीवनावर परिणाम होऊ शकतो. जर आरोग्य रेषेचा शेवटचा भाग लाल असेल तर अशा लोकांना डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.
हस्तरेखाशास्त्रानुसार आरोग्य रेषेवर अनेक लहान रेषा असणे हेदेखील चांगले लक्षण नाही. हे व्यक्तीच्या खराब आरोग्याचे लक्षण आहे. तळहातावर साखळी बांधलेली आरोग्य रेषा हेदेखील चांगले लक्षण नाही. याशिवाय आरोग्य रेषेवर बेट, क्रॉस, स्पॉट किंवा चौकोनी आकाराची निर्मिती देखील शुभ मानली जात नाही.
असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीची आरोग्य रेषा लाईफलाईनला स्पर्श करत नाही त्याचे आरोग्य चांगले असते. त्याचबरोबर तळहातावर आरोग्य रेषा असणे हे आरोग्याशी संबंधित समस्यांचे लक्षण आहे.
हस्तरेषाशास्त्रानुसार आरोग्यरेषा वाकडी असल्यास त्या व्यक्तीला दम्याचा विकार असू शकतो. तर, आरोग्यरेषा जास्त जाड असल्यास मेंदूत रक्तस्त्राव होण्याची शक्यता सांगितली गेली आहे. बऱ्याचवेळा हातावर आरोग्यरेषा असतेच असे नाही. जर नसेल तर अशा वेळी तिच्याऐवजी महात्रिकोणाच्या पायाची रेषा मस्तक रेषेपासून आयुष्य रेषेपर्यंत असेल तर मग असा योग हातावर असणाऱ्या माणसाला मोठे अधिकार मिळतात किंवा मग मोठे यश मिळते असे मानले जाते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या