Cross Mark on Shani Parvat: हाताच्या रेषा कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि स्वभावाबद्दल सांगतात. तसेच या रेषा व्यक्तीचे भविष्य देखील कथन करतात. त्याचे जीवन कसे जाईल, त्याची आर्थिक स्थिती कशी असेल, त्याचे कौटुंबिक जीवन, वैवाहिक सुख, संतानसुख, आरोग्य, आयुष्य, कारकिर्द, नोकरी-व्यवसाय या सर्वांबाबत हस्तरेषा बोलत असतात. हातात अनेक प्रकारच्या रेषा असतात आणि त्यावर अनेक प्रकारच्या खुणा किंवा चिन्हंही असतात. हाताच्या मधल्या बोटाला शनीचे बोट म्हणतात. या बोटाच्या अगदी खालच्या भागाला शनी प्रदेश किंवा शनी पर्वत म्हणतात. आज आम्ही तुम्हाला शनीच्या क्षेत्रावर असलेल्या क्रॉसच्या खुणेबद्दल माहिती देत आहोत.
हस्तरेखाशास्त्रानुसार तळहातावरील शनी पर्वतावर असलेल्या क्रॉसचे चिन्ह किंवा खूण अशुभ मानली जाते. असे म्हटले जाते की, हे चिन्ह दुर्दैव, अपघात आणि रोगाचे लक्षण आहे. जर क्रॉसचे चिन्ह मध्यभागी असेल तर अशी व्यक्ती निराशावादी असते, असे हस्तरेषाशास्त्रात म्हटले गेले आहे. असे लोक चिडचिडे स्वभावाचे असतात, असेही सांगितले गेले आहे.
हस्तरेखाशास्त्रानुसार जर क्रॉस मार्क एखाद्या व्यक्तीच्या भाग्यरेषेत गेला तर अशा व्यक्तीने खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. अशा व्यक्तीला दुखापत होण्याची शक्यता असते असे हस्तरेषाशास्त्रात म्हटले आहे.
शनी पर्वतावर जर ताऱ्याचे चिन्ह असेल तर तेही शुभ मानले जात नाही. ते अशुभ मानले जाते. असे लोक काही कारणास्तव तुरुंगात जाण्याची शक्यता असल्याचे हस्तरेषाशास्त्रात म्हटले गेले आहे.
हस्तरेखाशास्त्रानुसार शनी पर्वतावरील वर्ग किंवा चौकोनी आकार शुभ मानला जातो. असं म्हटलं जातं की ज्यांच्या हातावर या खुणा असतात त्यांना आयुष्यात कमी अडचणींना सामोरं जावं लागतं. किंवा त्याच्यापुढील अडचणी कमी होतात. शनी पर्वतावरील उभ्या रेषा नशिबाच्या प्रतीक मानल्या जातात. असे लोक आयुष्यात ज्या क्षेत्रात पाऊल ठेवतात त्या क्षेत्रात यश मिळवतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या