Palmistry : तळहातावरील Y चिन्हाचा अर्थ काय? जाणून घ्या त्यासंबंधीचे शुभ-अशुभ संकेत
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Palmistry : तळहातावरील Y चिन्हाचा अर्थ काय? जाणून घ्या त्यासंबंधीचे शुभ-अशुभ संकेत

Palmistry : तळहातावरील Y चिन्हाचा अर्थ काय? जाणून घ्या त्यासंबंधीचे शुभ-अशुभ संकेत

Dec 11, 2024 02:51 PM IST

Palmistry About Y Sign In Marathi : तळहातावरील रेषांपासून अनेक प्रकारचे चिन्ह तयार होतात, त्यापैकी एक म्हणजे Y चिन्ह होय. जाणून घ्या तळहातावरील Y चिन्ह शुभ आहे की अशुभ-

तळहातावरील Y चिन्ह काय दर्शवते
तळहातावरील Y चिन्ह काय दर्शवते

Meaning Of Y Mark In The Palm : ज्योतिष ही एक विद्या आहे. या विद्येने आपण कोणाच्याही आयुष्याबाबत, भविष्यातील घटनांबाबत काही अंदाज बांधू शकतो. हस्तरेषा शास्त्रात तळहातावरील रेषांवरुन भविष्य जाणले जाऊ शकते. हाताच्या तळव्यावर अनेक रेषा असतात. या तळहातांच्या रेषांवरुन एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कळू शकतो. हाताच्या बोटांची लांबी, उंची आणि यावर तयार झालेल्या वेगवेगळ्या रेषा, चिन्हांचा अभ्यास केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या हातावर जीवनरेषा, भाग्यरेषा, आयुषरेषा, मस्तिष्करेषा, हृदयरेषा यांसारख्या प्रमुख रेषा असतात. मात्र, यासह काही चिन्हे आर्थिक स्थिती, धन-दौलत, पैसा यासंबंधी दर्शवतात...

तळहातावर तयार झालेल्या खुणा किंवा चिन्ह अनेक संकेत देतात. तळहातावरील रेषेवर अनेक प्रकारच्या खुणा तयार होतात ज्यामुळे व्यक्तीच्या स्वभावाशी आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक रहस्ये उलगडतात. हस्तरेखाशास्त्रात तळहातावर तयार झालेल्या Y चिन्हाचे वर्णन केले आहे. तळहातावरील Y चिन्ह सुख-दु:ख आणि नशीब दर्शवते. जाणून घ्या तळहातावरील Y चिन्हाचे परिणाम -

तळहातावरील Y चिन्ह काय दर्शवते - हस्तरेषाशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर Y चिन्ह शुभ किंवा योग्य ठिकाणी असणे आवश्यक आहे. Y चिन्ह योग्य ठिकाणी असेल तर असे लोक खूप भाग्यवान मानले जातात. तथापि, अयोग्य ठिकाणी Y चे चिन्ह एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव देखील पाडते. जाणून घ्या य च्या चिन्हाशी संबंधित खास गोष्टी-

हस्तरेषाशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातातील Y चिन्ह मनगट आणि जीवनरेषा यांच्यामध्ये असेल तर ते शुभ मानले जाते. असे म्हणतात की, अशा लोकांचे जीवन सुखसोयींनी भरलेले असते. त्याचप्रमाणे Y चिन्ह जीवनरेषा आणि चंद्र पर्वताजवळ असेल तर असे लोक भाग्यवान ठरतात. असे लोक सुखी जीवन जगतात.

हस्तरेषाशास्त्रानुसार जेव्हा एखादी छोटी जीवनरेषा कापून Yचे चिन्ह उमटलेले असेल तेव्हा ती अशुभ मानली जाते. असे म्हटले जाते की, अशा लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. जीवनरेषेवरील एका छोट्या रेषेमुळे Y चिन्ह अशुभ परिणामही देते. असे म्हटले जाते की अशा लोकांना रोगांनी घेरलेले असते.

डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

Whats_app_banner