Palmistry: फक्त रेषांमध्येच नाही, तर तळहाताच्या बनावटीमध्येही लपली आहेत गुपिते
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Palmistry: फक्त रेषांमध्येच नाही, तर तळहाताच्या बनावटीमध्येही लपली आहेत गुपिते

Palmistry: फक्त रेषांमध्येच नाही, तर तळहाताच्या बनावटीमध्येही लपली आहेत गुपिते

Dec 30, 2024 02:38 PM IST

Palmistry in Marathi: हस्तरेषाशास्त्रानुसार रेषांव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीच्या तळहाताचा पोत व आकारावरून, म्हणजेच तळहाताची लांबी व रुंदीवरूनही अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज बांधता येतो.

फक्त रेषांमध्येच नाही, तर तळहाताच्या बनावटीमध्येही लपली आहेत गुपिते
फक्त रेषांमध्येच नाही, तर तळहाताच्या बनावटीमध्येही लपली आहेत गुपिते

Marathi Palmistry: हस्तरेषाशास्त्रानुसार तळहातावरील रेषा व चिन्हे भविष्यातील शुभ-अशुभ घटनांचे संकेत देतात. तळहातावर अशा अनेक रेषा असतात, ज्या व्यक्तीच्या सुख-सौभाग्याचे द्योतक असतात. त्याचवेळी तळहाताच्या काही रेषा भविष्याशी संबंधित अप्रिय घटना सूचित करतात. याशिवाय तळहाताचा पोत देखील व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकतो. माणूस किती नशीबवान आहे, तो आयुष्यात किती प्रगती करेल, या सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज एखाद्या व्यक्तीच्या तळहाताचा पोत आणि लांबी-रुंदी पाहून लावता येतो. जाणून घेऊ या, तळहाताच्या पोतावरून व्यक्तीच्या आयुष्याशी निगडीत रंजक गोष्टी...

मऊ तळहात

हस्तरेषाशास्त्रात मऊ तळवे अत्यंत शुभ मानले जातात. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीचा तळहात जितका मऊ आणि गुलाबी असतो तितकी ती व्यक्ती भाग्यवान असते. अशी व्यक्ती ऐशोआरामात राहते.

कठीण तळहात

मान्यतेनुसार ज्या लोकांचा तळहात कठोर असतो, त्यांना मेहनतीनंतरच सुख मिळते. हे लोक खूप प्रामाणिक असतात.

मोठा तळहात

ज्या लोकांचा तळहात मोठा असतो ते अतिशय हुशार आणि गंभीर स्वभावाचे असतात. मेहनतीच्या जोरावर त्यांना मोठे यश प्राप्त होते आणि त्यांना धार्मिक कार्यात रस असतो.

लहान तळहात

हस्तरेषाशास्त्रानुसार लहान तळवे असलेले लोक सुखी जीवन जगतात. ते खूप जिज्ञासू असतात. त्यांचे हृदय अतिशय स्वच्छ असते.

चौकोनी तळहात

तळहाताचा आकारही माणसाच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगतो. असे मानले जाते की ज्या लोकांचा तळहात चौकोनी असतो, असे लोक हुशार असतात. ते व्यवसायात यश मिळवतात आणि त्यांना संपत्ती आणि वैभव प्राप्त होते.

लांब बोटे

हस्तरेषाशास्त्रानुसार मऊ तळहात, पातळ, लांब व टोकदार बोटांमुळे व्यक्तीची सौंदर्यबुद्धी विकसित होते. स्वभावातील निष्काळजीपणामुळे व्यवसायात त्यांना फारसे यश मिळत नसले तरी कलात्मक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

तळहातातील खड्डा

तळहातामध्ये खड्डा असणे हे शुभ प्रतीक मानले जात नाही. असे मानले जाते की अशा लोकांचे जीवन समस्यांनी वेढलेले असते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner