Palmistry Ring Finger : समुद्र शास्त्रामध्ये, व्यक्तीच्या भूतकाळ, भविष्य आणि वर्तमानाशी संबंधित गोष्टी किंवा घटनांचे मूल्यमापन त्याच्या शरीराच्या अवयवांच्या संरचनेवरून केले जाते. शरीराचे अवयव देखील व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, करिअर आणि आर्थिक स्थिती दर्शवतात. हाताच्या बोटांच्या आकारावरून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती पैसा येईल आणि त्याचे आयुष्य कसे असेल इत्यादी गोष्टी कळू शकतात.
हातावरील रेषा, चिन्हे आणि बनावट पाहून एखादा व्यक्ती भाग्यशाली आहे किंवा नाही, हे सांगितले जाऊ शकते. आपल्या हाताला आणि पायाला असलेली सगळी बोटं ही कामाची आहेत. कोणत्याही बोटाला आपण निरुपयोगी किंवा कामाचं नाही, असं म्हणू शकत नाही. दैनंदिन कामात प्रत्येक बोटाला महत्त्व आहे; पण आपल्या हाताची सर्व बोटं सारखी नाहीत. या बोटांवर अनेक चिन्ह आणि विविध पद्धतीने रेषा असतात. अनामिका म्हणजेच रिंग फिंगर म्हणजेच करंगळीच्या शेजारचं बोट होय. ज्या बोटात अंगठी घालतात त्याला अनामिका म्हणतात.
समुद्र शास्त्रानुसार, अनामिका वर उभी रेषा निघून बोटाच्या पहिल्या टोकापर्यंत पोहोचली तर अशा व्यक्तीला सौभाग्य आणि संपत्ती प्राप्त होते. असे म्हणतात की, अशा लोकांना व्यवसायात चांगले यश मिळते.
हस्तरेषा शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या अनामिकेच्या पहिल्या भागावर काही उभ्या रेषा असतील तर अशा व्यक्तीचे जीवन आनंदी असते. जर एखाद्या व्यक्तीच्या अनामिकेच्या पहिल्या बोटाच्या सांध्यावर काही रेषा येतात, तर अशी व्यक्ती इतरांसाठी आकर्षक असते.
हस्तरेषा शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीची अनामिका हाताच्या सर्वात मोठ्या बोटापेक्षा म्हणजेच तर्जनीपेक्षा मोठी असेल तर असे लोक स्वाभिमानी असतात असे म्हणतात. असे लोकं आपल्या जोडीदाराची फार काळजीही घेतात.
जर एखाद्या व्यक्तीची तर्जनी आणि अनामिका यांची लांबी समान असेल तर अशा लोकांना कोणत्याही व्यक्तीचा आपल्या जीवनात हस्तक्षेप केलेला आवडत नाही.
अनामिका लहान असणे हे चांगले लक्षण मानले जात नाही. हस्तरेषा शास्त्रानुसार अशी व्यक्ती आपल्या प्रतिभेचा योग्य वापर न करून म्हणजेच चुकीच्या मार्गाने पैसे कमावते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या