Palmistry : तळहाताची ही रेषा सांगते लव्ह मॅरेज होणार की अरेंज? जाणून घ्या कसे असेल तुमचे वैवाहिक जीवन
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Palmistry : तळहाताची ही रेषा सांगते लव्ह मॅरेज होणार की अरेंज? जाणून घ्या कसे असेल तुमचे वैवाहिक जीवन

Palmistry : तळहाताची ही रेषा सांगते लव्ह मॅरेज होणार की अरेंज? जाणून घ्या कसे असेल तुमचे वैवाहिक जीवन

Nov 20, 2024 09:45 PM IST

Palmistry About Marriage Line In Marathi : तळहाताच्या रेषा आणि त्यावर तयार झालेले चिन्ह व्यक्तीच्या भवितव्याची माहिती देतात. जाणून घ्या तळहातावरील कोणत्या रेषा लग्नाच्या असतात, अरेंज मॅरेज होणार की लव्ह मॅरेज होणार कोणती रेषा सांगते.

हस्तरेषाशास्त्रानुसार लग्नरेषा कोणती
हस्तरेषाशास्त्रानुसार लग्नरेषा कोणती

Love Marriage Line In Hand In Marathi : ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला ग्रह-नक्षत्रावरून जशी कुंडलीची स्थिती जाणून घेता येते तसेच, हाताच्या रेषा देखील भविष्याविषयी बरीच माहिती देतात. हस्तरेषा शास्त्रात अनेक रेषा, चिन्ह, आकार आणि महत्त्वाची माहिती मिळते, ज्यात हातावरील या चार रेषा महत्वाच्या असल्याचे सांगण्यात येते. ज्यांच्या मदतीने व्यक्तीच्या आयुष्याविषयी अर्थात जीवनात काय घडणार आहे, याबाबत जाणून घेता येते.

हस्तरेषाशास्त्रात करिअर, आर्थिक जीवन आणि प्रेमजीवन इत्यादी गोष्टी तळहाताच्या रेषेतून उलगडतात. प्रत्येक व्यक्तीला लग्नाशी संबंधित गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. प्रत्येकाला उत्सुकता असते की आपला प्रेम विवाह होईल की अरेंज मॅरेज होईल. जाणून घ्या कोणती हातावरील रेषा तुमच्या लग्नाबद्दल सांगते. जाणून घ्या तळहाताच्या कोणत्या रेषेत लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज दिसून येते.

कोणती आहे विवाह रेषा - 

हस्तरेषाशास्त्रानुसार लग्नाच्या रेषा हाताच्या सर्वात लहान बोटाखाली असलेल्या बुध पर्वताशी जोडलेल्या असतात. बुध पर्वतावर बाहेरून आतून येणाऱ्या रेषेला विवाह रेषा म्हणतात. या रेषेच्या माध्यमातून कोणत्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन होणार आहे हे कळते. या रेषेवर तयार झालेली एक खूण त्या व्यक्तीचे लव मॅरेज होणार किंवा अरेंज मॅरेज होणार हे सांगते.

अरेंज मॅरेज होणार की लव्ह मॅरेज होणार हे कसे जाणून घ्यावे - 

हस्तरेषाशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातामध्ये विवाह रेषेवर चौकोनी चिन्ह असेल तर त्याच्या नशिबात प्रेमविवाहाची शक्यता वाढते. हे चिन्ह स्पष्ट असेल तर त्या व्यक्तीचा प्रेमविवाहच होईल असे म्हटले जाते. लग्नाच्या रेषेवर क्रॉसचे चिन्ह असेल तर त्या व्यक्तीला वैवाहिक जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. जर त्या व्यक्तीच्या हातातील सरळ आणि स्पष्ट रेषा लहान बोटाखाली असेल तर अरेंज मॅरेजची शक्यता वाढते. असे मानले जाते की, त्यांचे वैवाहिक जीवन इतर लोकांपेक्षा चांगले असते.

रेषा देतात प्रेमविवाहाचे संकेत - 

असे मानले जाते की अंगठ्याखालील बाहेर पडलेल्या भागाला शुक्र पर्वत म्हणतात. जर तो अधिक गडद दिसत असेल तर त्या व्यक्तिच्या लव्ह मॅरेजची शक्यता जास्त असते.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे, ती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner