तळहातावर गुणाकाराचे चिन्ह : हस्तरेषा शास्त्रानुसार व्यक्तीच्या तळहातावर अनेक रेषा, खुणा आणि चिन्हे असतात. तळहातावरील या रेषा एखाद्या व्यक्तीच्या नशिबापासून त्याच्या भविष्यापर्यंत अनेक रहस्ये उघड करू शकतात. अशा अनेक रेषा किंवा खुणा आहेत ज्या अत्यंत मर्यादित लोकांच्या तळहातावर आढळतात. पण ज्या लोकांच्या तळहातावर या खुणा असतात ते खूप भाग्यवान असतात. या रेषा किंवा खुणांच्या माध्यमातून जातकाचे करिअर, आर्थिक स्थिती व आरोग्य आदींची माहिती उपलब्ध होते.
तळहातावरील असेच एक चिन्ह म्हणजे गुणाकाराचे चिन्ह. असे मानले जाते की तळहातावरील गुणाकाराचे चिन्ह जिथे आहे तेथे शुभ परिणाम क्वचितच दिसून येतात. मात्र, काही ठिकाणी गुणाकाराची उपस्थिती शुभ फळ देते. जाणून घ्या तळहातावरील गुणाकाराच्या चिन्हाचा अर्थ आणि शुभ-अशुभ परिणाम.
गुरु पर्वतावर गुणाकाराचे चिन्ह असणे शुभ मानले जाते. याशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह अशुभ मानले जाते. गुरु पर्वतावरील गुणाकाराचे चिन्ह सुख-समृद्धी दर्शवते. अशा लोकांचे वैवाहिक जीवन सुखी असते. तळहाताच्या पहिल्या बोटाच्या खालचा भाग म्हणजे गुरु पर्वत.
१ - हस्तरेषा शास्त्रानुसार जर गुणाकाराची खूण तर्जनी बोटाजवळ किंवा गुरु पर्वतावर असेल तर असे लोक आयुष्यात लहान वयातच प्रेमसंबंधात पडतात. पण हे नातं फार काळ टिकत नाही.
२ - हस्तरेषा शास्त्रानुसार तळहाताच्या मधल्या बोटाखाली शनी पर्वतावरील गुणाकाराचे चिन्ह अशुभ असते. शनी पर्वतावरील गुणाकाराच्या चिन्हामुळे त्या व्यक्तीला इजा होण्याची शक्यता असते.
३ - बऱ्याच लोकांच्या दोन्ही तळहातावर गुणाकाराचे चिन्ह असते. हस्तरेषा शास्त्रानुसार असे लोक असे काम करतात जे या जगातून गेल्यावरही लक्षात राहतात. असे लोक खूप मोठा वारसा सोडून जातात.
४ - असे म्हटले जाते की ज्या लोकांच्या तळहाताच्या मंगळ पर्वतावर गुणाकाराची खूण असेल तर त्यांचे जीवन वेदनादायक असते. अशा लोकांचं आयुष्य वादविवादांनी भरलेलं असतं.
५ - एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर सूर्य पर्वतावरील गुणाकाराची खूण असेल तर अशा लोकांच्या जीवनात मान-सन्मानाची हानी होते. अशा लोकांना व्यवसायातही तोट्याला सामोरे जावे लागते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे हे पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)