Palmistry: हस्तरेषाशास्त्रानुसार हे लोक असतात अतिशय भाग्यवान, भरपूर कमावतात संपत्ती!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Palmistry: हस्तरेषाशास्त्रानुसार हे लोक असतात अतिशय भाग्यवान, भरपूर कमावतात संपत्ती!

Palmistry: हस्तरेषाशास्त्रानुसार हे लोक असतात अतिशय भाग्यवान, भरपूर कमावतात संपत्ती!

Nov 16, 2024 12:01 PM IST

Palmistry in Marathi: हस्तरेषाशास्त्रानुसार जेव्हा एखादी रेषा तळहाताच्या मुळापासून म्हणजेच मनगटाजवळ (ब्रेसलेट) सुरू होऊन थेट मधल्या बोटाकडे जाते, तेव्हा त्याला भाग्यरेषा (Line of Luck) म्हणतात. चला जाणून घेऊया, हस्तरेषाशास्त्रानुसार कोण भाग्यवान आहे!

हस्तरेषाशास्त्रानुसार हे लोक असतात अतिशय भाग्यवान, भरपूर कमावतात संपत्ती!
हस्तरेषाशास्त्रानुसार हे लोक असतात अतिशय भाग्यवान, भरपूर कमावतात संपत्ती!

hastresha shastra in Marathi: हस्तरेषाशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीची माहिती तळहातावर असलेल्या रेषांद्वारे मिळवली जाते. हस्तरेषाशास्त्रासाठी माणसाच्या भवितव्याचा आणि भूतकाळाचा अंदाज बांधता येतो. हस्तरेषाशास्त्रानुसार जेव्हा एखादी रेषा तळहाताच्या मुळापासून म्हणजेच मनगटाजवळ (ब्रेसलेट) सुरू होऊन थेट मधल्या बोटाकडे जाते, तेव्हा त्याला भाग्यरेषा म्हणतात. प्रत्येक व्यक्तीची भाग्यरेषा वेगळी असते. कुणाची सरळ लांब रेषा, कुणाच्या हातातली तुटलेली रेषा, तर कुणाच्या तळगातावर अडवी तिडवी रेषा. चला जाणून घेऊया, हस्तरेषाशास्त्रानुसार कोण भाग्यवान आहे.

भाग्यरेषा सरळ असणारे लोक असतात भाग्यवान

ज्यांच्या तळहातातील भाग्यरेषा सरळ चालत शनी पर्वतावर पोहोचते, ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. अशी व्यक्ती अतिशय महत्त्वाकांक्षी आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करणारी असते. असे लोक अफाट संपत्तीचे मालक असतात. नोकरीत त्यांना उच्च पद आणि समाजात खूप मान सन्मान मिळतो. असे लोक भरपूर संपत्ती कमावतात.

अशा व्यक्तीला मिळते सर्वकाही

भाग्यरेषा सरळ असणाऱ्या व्यक्तीला पैशांची चणचण भासत नाही.अशा व्यक्तीकडे भरपूर संपत्ती असते. ही रेषा जर गडद असेल आणि मध्ये कुठेच तुटलेली नसेल, तर अशा व्यक्तीला भरपूर संपत्तीचा लाभ मिळतो. तसेच अशा व्यक्तीच्या मानमरातबात कोणतीही कमी राहात नाही. तसेच त्या व्यक्तीला मोठं पदही मिळतं. असं सांगितलं जातं की ज्या व्यक्तीची भाग्यरेषा सरळ आणि गडद असते, मध्ये कुठेच तुटलेली नसते, अशा व्यक्तीला सर्वकाही मिळते.

भाग्यरेषा विभाजित होत असेल तर काय संकेत आहेत?

हस्तरेषाशास्त्रानुसार जर एखादी रेषा शनी पर्वतावर पोहोचत असेल आणि विभाजित होऊन गुरु पर्वत अर्थात तर्जनी बोटाखाली पोहोचत असेल, तर ती व्यक्ती अत्यंत दानशूर आणि परोपकारी स्वभावाची असते. अशा व्यक्तीला उच्च पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते.

हस्तरेषा तुटलेली असेल तर काय समजावे?

भाग्यरेषा विभाजित किंवा तुटलेली असेल तर ते भाग्यहिनतेचं लक्षण समजलं जातं. जर एखाद्या व्यक्तीची भाग्यरेषा हृदयरेषेवर येऊन थांबली असेल, तर त्या व्यक्तीला प्रेमसंबंधांमध्ये अपयश प्राप्त करावे लागते. परंतु, जर ही रेषा हृदयरेषेपासून गुरू पर्वतापर्यंत थेट पोहोचत असेल, तर अशा व्यक्तीला प्रेमसंबंधात यश प्राप्त होत असते, असे हस्तरेषाशास्त्र सांगते.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner