Palmistry:तुमच्या तळहातावर ही ५ चिन्हं आहेत का? मानली जातात शुभ; मिळते भाग्याची मोठी साथ!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Palmistry:तुमच्या तळहातावर ही ५ चिन्हं आहेत का? मानली जातात शुभ; मिळते भाग्याची मोठी साथ!

Palmistry:तुमच्या तळहातावर ही ५ चिन्हं आहेत का? मानली जातात शुभ; मिळते भाग्याची मोठी साथ!

Nov 21, 2024 05:21 PM IST

Lucky signs and symbols on plam: हस्तरेषाशास्त्रातील काही चिन्हे किंवा खुणा अत्यंत शुभ मानल्या जातात. तळहातावर या खुणा तयार होणे अत्यंत शुभ असते, असे म्हटले जाते. जाणून घ्या त्यांच्या फळांविषयी-

तुमच्या तळहातावर ही ५ चिन्हं आहेत का? मानली जातात शुभ; मिळते भाग्याची मोठी साथ!
तुमच्या तळहातावर ही ५ चिन्हं आहेत का? मानली जातात शुभ; मिळते भाग्याची मोठी साथ!

Lucky signs in Palmistry: व्यक्तीच्या तळहातावर तयार झालेल्या काही रेषा अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. या रेषा एक चिन्ह, खूण किंवा आकार देखील तयार करतात. रेषांनी तयार केलेले चिन्ह किंवा खुणा किंवा आकार शुभ किंवा अशुभ फळ देऊ शकतात, असे हस्तरेषाशास्त्रात मानले गेले आहे. खुणांचे फळ त्यांच्या स्थितीवर अवलंबून असते. तळहातावर तयार झालेल्या काही खुणा जातकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात आणि नशिबाची साथ मिळते. जाणून घ्या या गुणांबद्दल…

M चे चिन्ह

काही व्यक्तींच्या तळहातावर M हे चिन्ह असते.  तळहातावर तीन रेषांनी बनलेले M चिन्ह शुभतेचे प्रतीक मानले गेले आहे. असे म्हटले जाते की, भाग्यवान लोकांच्या हातावर ही खूण तयार होते. हस्तरेषाशास्त्रानुसार ज्या लोकांच्या हातावर M ही खूण असतो, त्यांना नशिबामुळे आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या येत नाहीत, किंवा आल्या तरी त्या कमी असतात.

माशांचे चिन्ह

तळहातावर असलेले माशाचे चिन्ह शुभ मानले जाते. हस्तरेखाशास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या तळहातावर माशांचे चिन्ह असते त्यांच्या करिअरमध्ये  प्रगती होते. त्याच प्रमाणे अशा व्यक्तीच्या व्यवसायातही प्रगती होते.

स्वस्तिक चिन्ह

व्यक्तीच्या तळहातावरील स्वस्तिकचे चिन्ह शुभ मानले जाते. असे लोक नोकरीत तर प्रगती साधतातच, परंतु ते व्यवसायात किंवा व्यापारातही प्रगती साधतात, असे म्हटले जाते. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देखील प्राप्त होते.

कमळ चिन्ह

तळहातावरील कमळाचे चिन्ह शुभ मानले जाते. कमळाच्या चिन्हाला विष्णूयोग असेही म्हणतात. असे म्हटले जाते की, ज्या लोकांच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असते ते भाग्याने श्रीमंत मानले जातात आणि आर्थिक समृद्धी प्राप्त करतात.

त्रिशूल चिन्ह

तळहातावरील चिन्ह अत्यंत शुभ मानले जाते. ही खूण तळहातावर केल्यास जातकाला मान-सन्मान मिळतो. सूर्यरेषेवर त्रिशूल चिन्ह तयार झाल्यास त्या व्यक्तीला सरकारी नोकरीतही यश मिळते. आर्थिक दृष्ट्या जीवन समृद्ध राहते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner