October Grah Gochar : ऑक्टोबर महिना सुरू झाला असून, या महिन्यात ग्रह-नक्षत्राच्या स्थितीत बदल होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये ९ तारखेला गुरु ग्रह मिथुन राशीत वक्री होईल. १७ तारखेला सूर्य ग्रह तूळ राशीत संक्रमण करेल, २० तारखेला मंगळ ग्रह कर्क राशीत मार्गी होईल, १० तारखेला बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल त्यानंतर २९ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत जाईल. १३ तारखेला शुक्र ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल. ऑक्टोबरमध्ये अनेक ग्रहांच्या राशी बदलामुळे सर्व १२ राशींवर परिणाम होईल.
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार ऑक्टोबर महिना काही राशींसाठी शुभ राहणार आहे, तर काही राशींसाठी सावध राहण्याची गरज आहे. ज्योतिषाकडून जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी ऑक्टोबरमध्ये काळजी घ्यावी.
कर्क राशीच्या लोकांवर ऑक्टोबर महिन्यातील ग्रहाचे संक्रमण अशुभ ठरेल. या महिन्यात सांभाळून राहावे. आर्थिक नुकसान होईल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. मनावर दडपण निर्माण होईल. मन अस्थिर राहील.
सिंह राशीच्या लोकांनी सांभाळून राहावे. हा महिना नकारात्मक परिणामांचा राहील. कोणालाही उधार देऊ नये. पैसे जपून वापरावे. विनाकारणचा खर्च टाळावा. आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मनावर नियंत्रण ठेवावे.
या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहावे. या राशींसाठी ग्रहांची स्थिती अनुकूल राहणार नाही. महिन्याच्या सुरुवातीला सूर्यग्रहण देखील होत आहे, ज्याचे नकारात्मक परिणाम होतील. आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सावध राहणे आवश्यक आहे. महत्त्वाचे निर्णय थांबवणे चांगले राहील. वादविवादापासून दूर राहणे योग्य राहील.
बुधवारी २ ऑक्टोबरला सर्वपितृ अमावस्येला सूर्यग्रहण होईल. भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण रात्री ९:१२ वाजता सुरू होईल आणि ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:१७ वाजता संपेल. सर्वपितृ अमावस्येला होणारे सूर्यग्रहण सर्व १२ राशींवर परिणाम करेल. हे ग्रहण जनतेसाठी शुभ ठरणार नाही. भारतात हे ग्रहण दिसणार नाही त्यामुळे वेधादि नियम पाळले जाणार नाही. परंतू, ग्रहणाचा ५० टक्के परिणाम होईल, त्यामुळे सांभाळून राहावे असे सांगितले जाते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)