मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ank Jyotish : शनीदेवाला अत्यंत प्रिय असतात 'या' जन्म तारखेचे लोक! अडचणीत मिळते साथ, होते भरभराट

Ank Jyotish : शनीदेवाला अत्यंत प्रिय असतात 'या' जन्म तारखेचे लोक! अडचणीत मिळते साथ, होते भरभराट

Jun 23, 2024 11:45 AM IST

Numerology According Lord Shani Favorite Mulank : अंकशास्त्रात भविष्य सांगण्यासोबतच स्वभाव, आवडी-निवडी, गुणदोष याबाबतही खुलासा होतो. जाणून घ्या शनिदेवाचा मूलांक कोणता आहे.

अंकशास्त्र, अंकज्योतिषानुसार शनीदेवाला अत्यंत प्रिय मूलांक
अंकशास्त्र, अंकज्योतिषानुसार शनीदेवाला अत्यंत प्रिय मूलांक

ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रसुद्धा तितकेच महत्वाचे समजले जाते. अंकशास्त्रालाच संख्याशास्त्र, न्यूमरॉलॉजी, अंकज्योतिष, अंकभविष्य अशा विविध नावाने संबोधण्यात येते. अंकशास्त्रात भविष्य सांगण्यासोबतच स्वभाव, आवडी-निवडी, गुणदोष याबाबतही खुलासा होतो. अंकभविष्यात मूलांकाच्या आधारे या गोष्टींचे अंदाज बांधले जातात. एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक असे म्हटले जाते. अंकशास्त्रात १ ते ९ असे एकूण ९ मूलांक असतात. प्रत्येक मूलांकाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. त्यामुळेच अंकशास्त्रातील प्रत्येक मूलांक कोणत्या ना कोणत्या कारणाने खास असतो.

अंकशास्त्रात ८ या मूलांकालादेखील महत्वाचे स्थान आहे. ८ या अंकाला शनिदेवाचा अंक म्हणून संबोधले जाते. त्यामुळेच शनिदेवाला ८ हा अंक अतिशय प्रिय आहे. या मूलांकाच्या लोकांवर नेहमीच शनिदेवाची कृपादृष्टी असते. कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. पाहूया ८ या मुलांकाचे लोक नेमके कशा स्वभावाचे असतात.

नवग्रहांपैकी शनी ग्रह हा अतिशय महत्वाचा ग्रह समजला जातो. या नऊ ग्रहांमध्ये विविध गुणधर्म पाहायला मिळतात. शनी ग्रह ८ या मूलांकाचा स्वामी ग्रह असल्याने. शनी ग्रहात असलेले न्यायप्रियता, बुद्धिमत्ता, एकनिष्ठपणा आणि आत्मचिंतन हे सर्व गन मूलांक ८ च्या लोकांमध्ये पाहायला मिळतात. या गुणधर्मांच्या आधारे हे लोक वागणूक करत असतात. त्यामुळेच या लोकांना कोणासोबतही अन्याय झालेले सहन होत नाही. नेहमीच त्यांचा स्वभाव न्यायप्रिय असतो. हे लोक आपल्या जवळच्या लोकांशी एकनिष्ठ असतात. शिवाय त्यांना प्रत्येक गोष्टीत अंतर्मुख होऊन विचार करणे आवडते.

मूलांक ८ च्या लोकांवर नेहमीच शनी देवाचा आशीर्वाद असतो. त्यामुळे आयुष्यात कितीही संकटे आली तर हे लोक अगदी संयमाने त्यातून बाहेर पडतात. खाजगी आयुष्यातच नव्हे तर आपल्या कामाप्रतीसुद्धा हे लोक प्रचंड एकनिष्ठ असतात. त्यांना इतरांवर अवलंबून राहणे आवडत नाही. स्वतःचे काम स्वतः केल्याने त्यांना प्रचंड आत्मविश्वास मिळतो. आणि म्हणूनच ही लोक आयुष्यात यशस्वी होतात.

मूलांक ८ चे लोक आर्थिक बाबतीत फारच नशिबवान असतात. या लोकांना आयुष्यात प्रचंड पैसा आणि धनसंपत्ती मिळते. वास्तविक या लोकांना बचत करण्याची चांगली सवय अवगत असते. विनाकारण खर्च करणे यांना पसंत नसते. आणि त्यामुळेच यांच्याकडे धनसाठा चांगला असतो. शिवाय उद्योग-व्यवसाय आणि नोकरीमध्येसुद्धा अतिशय मेहनत घेऊन हे लोक धनसंपत्ती मिळवतात. तसेच या लोकांसाठी ८, १७, २६ या तारखा फारच लकी असतात. याशिवाय सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवससुद्धा शुभ असतात. रंगाच्याबाबतीत सांगायचे झाले तर या लोकांसाठी चॉकलेटी, निळा आणि काळा रंग शुभ असतो.

WhatsApp channel