विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण असतो. विवाहाने आपले संपूर्ण आयुष्य बदलून जाते. लग्नकार्याशी नवी आशा, नवी स्वप्ने जोडलेली असतात. असे म्हटले जाते या एका निर्णयाने दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबाचे आयुष्य बदलत असते. त्यामुळेच लग्नाविषयी अनेकांना एक वेगळीच उत्सुकता लागून असते. मात्र आपले अरेंज मॅरेज होणार की लव मॅरेज होणार याबाबाबत अनेकांना हुरहूर लागून असते. तर जोतिषशास्त्रामध्ये अंक शास्त्राचा आधार घेऊन याबाबत आपल्याला अंदाज बांधता येतो. तुमच्या मूलांकावरुन तुम्ही लग्न अरेंज की लव पद्धतीने करणार याबाबत जाणून घेता येते.
राशीभविष्यात ज्याप्रकारे राशींना महत्व आहे. त्याप्रमाणेच अंकशास्त्रात मूलांक हा महत्वाचा घटक आहे. मूलांकाच्या साहाय्याने तुमच्या भविष्याबाबत भाकीत केले जाते. बहुतांश लोकांना मूलांक म्हणजे काय याबाबत अद्याप कल्पना नाही. तर तुमच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक असे म्हणतात. मूलांकाच्या आधारे त्या-त्या व्यक्तीच्या करिअर, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि लव्ह लाईफबाबत अंदाज बांधले जातात. आज आपण याच मूलांकांचा आधार घेत तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज होणार याबाबत जाणून घेणार आहोत.
मूलांक १ हा अंक सूर्याचा प्रतीक आहे. या मूलांकाचे लोक अतिशय लाजाळू स्वभावाचे असतात. या लोकांना आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करणे कठीण जाते. त्यामुळे तुमचे लव्ह मॅरेज होणे कठीण आहे.
मूलांक २ हा अंक चंद्राचे प्रतीक आहे. या मूलांकाचे लोक अत्यंत विश्वासाने आणि काळजीपूर्वक प्रेमसंबंध निभावतात. तसेच ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यासोबतच लग्न करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. त्यामुळे तुमची लव्ह मॅरेज होण्याची शक्यता जास्त आहे.
मूलांक ३ हा अंक गुरुचे प्रतीक आहे. हे लोक अतिशय मनमोकळ्या स्वभावाचे असतात. आणि हे लोक प्रामुख्याने लव्ह मॅरेजच करण्याला प्राधान्य देतात.
मूलांक ४ हा अंक राहूचे प्रतीक आहे. या मूलांकाचे लोक आपल्या आयुष्यात अनेक प्रेमसंबंध करतात. विवाहसुद्धा लव्ह मॅरेज पद्धतीने करतात. मात्र चंचल स्वभावामुळे इतरांशीसुद्धा फ्लर्ट करण्यास मागे पुढे पाहत नाहीत.
मूलांक ५ हा अंक बुधचे प्रतीक आहे. हे लोक पारंपरिक पद्धतीने आयुष्य जगण्याला महत्व देतात. त्यामुळेच हे लोक अरेंज मॅरेजच करतात. अपवादात्मक कुणी लव्ह मॅरेज केले तरी आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन त्यांची परवानगी मिळवूनच लग्न करतात.
मूलांक ६ हा अंक शुक्राचे प्रतीक आहे. या मूलांकाचे लोक नेहमीच लव्ह मॅरेज करण्यात यशस्वी होतात. मात्र अति विचार करण्याच्या सवयींमुळे सतत काळजीत जगत असतात.
मूलांक ७ हा अंक केतूचे प्रतीक आहे. या मूलांकांचे लोक अतिशय संकुचित स्वभावाचे असतात. त्यामुळे मनात इच्छा असूनसुद्धा लव्ह मॅरेज करण्याची फारशी धडाडी दाखवत नाहीत. मात्र हे लोक ज्या व्यक्तीशी विवाह करतात त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात.
मूलांक ८ हा अंक शनीचे प्रतीक आहे. हे लोक अत्यंत जिद्दी असतात. या लोकांना जर लव्ह मॅरेज करायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत ते ध्येय साध्य करतात.
मूलांक ९ हा अंक मंगळचे प्रतीक समजले जाते. या लोकांचा स्वभाव थोडा तापत आणि तडकाफडकी असा असतो. त्यामुळे हे लोक कोणत्याही नात्यात जास्त काळ टिकू शकत नाहीत. आणि म्हणूनच हे लोक कुटुंबियांच्या पसंतीने अर्थातच अरेंज मॅरेज करण्यावर भर देतात.
संबंधित बातम्या