ज्योतिषीय अभ्यासात राशीभविष्य, रत्न शास्त्र, वास्तुशास्त्र, हस्तरेखा शास्त्र असे विविध शास्त्र प्रसिद्ध आहेत. त्यानुसारच अंकशास्त्रसुद्धा प्रचंड महत्वाचे आहे. अंकशास्त्राचा आधार घेऊन भविष्य सांगण्यात येते. सर्वसामान्य लोकच नव्हे तर अनेक लोकप्रिय सेलिब्रेटीसुद्धा आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यात अंक शास्त्राचा सल्ला घेत असतात. बहुतांश लोक कोणातेही शुभ कार्य करण्यापूर्वी अंकभविष्य अवश्य पाहतात. अंकशास्त्रात केवळ भविष्यच सांगत नाही तर, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे गुणदोष, आवडी-निवडी याबद्दलदेखील खुलासा केला जातो.
राशीभविष्यात भविष्य सांगण्यासाठी राशींचा आधार घेतला जातो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रात भविष्य सांगण्यासाठी मूलांकाचा आधार घेतला जातो. हे मूलांक त्या-त्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन निश्चित होतात. सांगायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्यालाच मूलांक म्हटले जाते. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख १४ असेल तर त्याच्या बेरेजवरुन त्याचा मूलांक ५ असतो. अशाप्रकारे अंक शास्त्रात १ ते ९ असे एकूण ९ मूलांक असतात.
अंक शास्त्रानुसार प्रत्येक मूलांकाचे एक वेगळे वैशिष्टय आणि गुणधर्म असते. त्या जन्म तारखेच्या लोकांवर त्या मूलांकाचा थेट प्रभाव पडत असतो. त्यामुळेच काही मूलांकाचे लोक अतिशय खास बनतात. यामध्ये १ या मूलांकाचा आवर्जून समावेश होतो. कोणत्या महिन्याच्या १, १०, १९,२८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. १ या मुलांकाचे लोक एक प्रेमी म्हणून फारच उत्तम असतात. या मूलांकाचे लोक आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात. हे लोक त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असतात. त्यामुळे कधीच आपल्या जोडीदाराला धोका देत नाहीत.
अंक शास्त्रानुसार प्रत्येक मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो. आणि ग्रहांचा प्रभाव त्या मूलांकावर असतो. मूलांक १ चा स्वामी ग्रह सूर्य आहे. सूर्य तेज, आत्मविश्वास, महत्वकांक्षा, नेतृत्व आणि दृढनिश्चय या गोष्टींचा प्रतीक असतो. त्यामुळे मूलांक १ च्या लोकांमध्ये सूर्याचे गुणधर्म दिसून येतात. या लोकांचे व्यक्तिमत्व नेहमीच सूर्यासारखे झळकत असते. तसेच हे लोक अतिशय दृढनिश्चयी असल्याने कोणतेही काम पूर्ण केल्याशिवाय शांत राहात नाहीत. हे लोक सर्वगुण संपन्न असतात. शिवाय ते अत्यंत विश्वासू असतात.
मूलांक १ चे लोक आपल्या जोडीदाराशी प्रचंड एकनिष्ठ असतात. त्याचा विश्वास ते जीवापाड जपतात. परंतु तुम्हाला माहितेय का मूलांक १ चे जोडीदार असणारे नशीबवान मूलांक कोणते आहेत. अंक शास्त्रानुसार, मूलांक १ चे मूलांक २, ३ आणि ९ च्या लोकांसोबत अधिक जमते. त्यामुळेच जास्तीत-जास्त याच मूलांकाचे लोक त्यांचे जोडीदार बनतात.