प्रत्येक व्यक्तीसाठी आपली जन्म तारीख प्रचंड खास असते. अनेक लोक आपल्या जन्म तारखेलाचा आपला लकी नंबर समजतात. वास्तविक जन्म तारखा तुमच्या स्वभावावर आणि आयुष्यावर प्रचंड प्रभाव टाकत असतात. जोतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन त्यांचे भविष्य, स्वभाव आणि गुणदोष समजत असतात. प्रत्येक अंक विविध गुणदोषांचे प्रतिनिधित्व करत असतात.
जोतिषशास्त्रामध्ये राशीभविष्याप्रमाणेच अंक भविष्यालासुद्धा विशेष महत्व आहे. अंकभविष्यात अंकावरुन एखाद्या व्यक्तीबाबत अनेक रहस्ये उघड केली जातात. हा अंक म्हणजे मूलांक असतो. अंक भविष्यात एकूण ९ मूलांक असतात. बहुतांश लोकांना मुलांकबाबत माहिती नसेल. तर तुमच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक म्हटले जाते. उदाहरणार्थ जे तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २३ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक ५ असतो. मूलांकावरुन व्यक्तीचे भविष्यच नव्हे तर स्वभाव आणि गुणदोषसुद्धा जाणून घेता येतात. आज आपण अशाच एका मूलांकाबद्दल जाणून घेणार आहे.
आज आपण ३ या मूलांकाबाबत काही खास तथ्ये पाहणार आहोत. कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. आज आपण ३ या मूलांकाच्या मुलींची स्वभाववैशिष्टये जाणून घेणार आहोत. या मूलांकाच्या मुली अत्यंत प्रभावशाली आणि नशीबवान असतात. आपल्या स्वभावाच्या जोरावर लोकांची मने जिंकण्यात त्या नेहमीच यशस्वी होतात. जोतिषअभ्यासानुसार ३ या मूलांकाच्या मुली आपल्या वडिलांसाठी प्रत्येक गोष्टीत नशीबवान ठरतात.
मूलांक ३ च्या मुली प्रचंड नशीबवान असतात. या मुली ज्या घरात जन्म घेतात त्याठिकाणी धनसंपत्तीची कधीच कमतरता भासत नाही. या मुली ज्या ठिकाणी राहतात तेथे आनंद आणि समृद्धी असते. या मूलांकच्या मुली कोणतेही काम अर्धवट न सोडता पूर्णत्वास नेतात. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय विश्वासू समजले जाते. बुद्धी आणि जिद्दीमुळे कामाच्या ठिकाणी यांचे नेहमीच कौतुक होत असते. मूलांक ३ च्या मुलींना समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा आकांक्षा असते. यामध्ये त्या यशस्वीसुद्धा होतात. स्वतःच्या कामावर त्यांना प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यामुळे यश त्यांच्या पदरात पडते.
मूलांक ३ च्या मुली स्वतःसाठी तर लकी असतातच पण महत्वाची बाब म्हणजे या मुली आपल्या वडिलांसाठीसुद्धा अत्यंत नशीबवान असतात. बहुतांश ठिकाणी या मुली आपल्या वडिलांच्या व्यवसायात कामात सल्ला देत असतात. त्यामुळे त्यांना आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतो . या मुली संकट काळात नेहमीच संयमाने आणि धाडसाने सोबत उभ्या राहतात. त्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांना त्यांची ओढ असते.