मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ank Jyotish : पतीसाठी प्रचंड लकी असतात 'या' जन्म तारखेच्या मुली! लक्ष्मी पावलांनी येऊन चमकवतात नशीब

Ank Jyotish : पतीसाठी प्रचंड लकी असतात 'या' जन्म तारखेच्या मुली! लक्ष्मी पावलांनी येऊन चमकवतात नशीब

Jun 25, 2024 01:14 PM IST

Which Mulank Girls Lucky For Husband : अंकशास्त्रात १ ते ९ असे एकूण ९ मूलांक असतात. या मूलांकावरुन व्यक्तींचे स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरेच काही सांगण्यात येते. अंक ज्योतिषानुसार या मूलांकाच्या मुली आपल्या नवऱ्यासाठी लकी ठरतात. जाणून घ्या यासंबंधीत सविस्तर.

अंकज्योतिष, पतीसाठी प्रचंड लकी जन्मतारखेच्या मुली
अंकज्योतिष, पतीसाठी प्रचंड लकी जन्मतारखेच्या मुली

Ank Jyotish About Which Mulank Girls Lucky For Husband : अंकशास्त्रात लोकांचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल बरेच काही सांगण्यात येते. प्रत्येक व्यक्तीचे मूलांक त्याच्या जन्म तारखेच्या आधारे ठरत असते. जन्म तारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्यालाच मूलांक असे म्हटले जाते. अंकशास्त्रात १ ते ९ असे एकूण ९ मूलांक असतात. या मूलांकावरुन व्यक्तींचे भविष्य ठरत असते.

प्रत्येक मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो. त्या ग्रहाचा प्रभाव या मुलांकावर पडत असतो. त्यामुळेच प्रत्येक मुलांकाचे एक वेगळे वैशिष्ट्य आणि गुणधर्म असते. ज्योतिष शास्त्रानुसार काही मूलांकाच्या मुली आपल्या पतीसाठी प्रचंड नशीबवान असतात. लग्नानंतर पतीच्या आयुष्यात सकारत्मक बदल तर घडवतातच शिवाय करिअरमध्ये प्रचंड यश मिळवतात. पाहूया या मुली नेमक्या कोणत्या आहेत.

कोणत्या मूलांकाच्या मुली पतीसाठी असतात लकी?

अंक शास्त्रानुसार ३ या मूलांकाच्या मुली आपल्या पतीसाठी नशिबवान असतात. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला झाला असेल तर त्यांचा मूलांक ३ असतो. बृहस्पति, देवतांचा गुरु म्हणजेच गुरु ग्रह मूलांक 3 चा स्वामी आहे. गुरुच्या प्रभावामुळे या मूलांकाच्या लोकांच्या आयुष्यात आनंद आणि सौभाग्य येते. या मूलांकाच्या मुलीही लग्नानंतर आपल्या पतींसाठी भाग्याची आणि यशाची गुरुकिल्ली घेऊन येतात.

मूलांक ३ च्या मुलींवर नेहमीच गुरुदेवाची कृपादृष्टी असते. या मुली अत्यंत भाग्यवान आणि सुखी असतात. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. विशेष म्हणजे या मुलींच्या भाग्याचा शुभ प्रभाव त्यांच्या पतीच्या आयुष्यावरदेखील पडतो. त्यांच्या पावलांनी पतीच्या घरात लक्ष्मी प्रवेश करते. पतीच्या उद्योग-व्यवसायात विस्तार नॉतॉ. नोकरीत असणाऱ्यांना बढतीचे योग जुळून येतात. शिवाय विविध मार्गाने धनलाभ होतो. उत्पन्नाचे नवे मार्ग त्यांच्यासाठी खुले होतात. रखडलेली कामे मार्गी लागायला सुरुवात होते. त्यामुळे अगदी कमी वेळेत यांची मोठी प्रगती होते.

मूलांक ३ च्या मुलींसोबत लग्न झालेल्या मुलांची समाजातील प्रतिमा आणखी उठावदार बनते. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. शिवाय त्या मुलींचा सल्ला व्यवसायात किंवा नोकरीत लाखमोलाचा सिद्ध होतो. आर्थिक चणचण दूर होऊन विविध मार्गाने धनलाभ होतो. या मुलींवर गुरु देव प्रसन्न असल्याने त्यांची बौद्धिक क्षमता मजबूत होते. याचा बराच फायदा त्यांच्या पतींनादेखील होतो.

WhatsApp channel
विभाग