राशी भविष्याप्रमाणेच अंकभविष्यालासुद्धा तितकेच महत्व आहे. अनेक लोक आपल्या आयुष्याची घडी बसवण्यासाठी अंकभविष्याचा आधार घेतात. अंक भविष्यात तुमच्या जन्मतारखेला विशेष महत्व आहे. जन्म तारखेच्या बेरजेच्या आधारावरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक असे संबोधले जाते. या मूलांकावरुन तुमचे भविष्य सांगितले जाते. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख १५ आहे तर तर त्याच्या बेरजेवरुन तुमचा मूलांक ६ असेल.
अंक भविष्यात एकूण १ ते ९ असे मूलांक आहेत. या मूलांकावरुन आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कोणता रंग, कोणता अंक तुमच्यासाठी शुभ ठरेल हे सांगितले जाते. शिवाय तुमचा स्वभावसुद्धा यावरुन सांगितला जातो. अंक भविष्यानुसार काही जन्म तारखा इतक्या शुभ आहेत की त्यांना आयुष्यात अफाट संपत्ती आणि पैसा मिळतो. पाहूया नेमक्या कोणत्या जन्म तारखा शुभ आहेत.
जोतिष अभ्यासानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला होतो. या लोकांचा मूलांक ९ असतो आणि हे लोक आर्थिक बाबतीत अतिशय नशीबवान असतात. या लोकांना आयुष्यात अजिबात धनाची कमतरता भासत नाही. शिवाय अफाट संपत्ती मिळते. हे लोक आर्थिक सुखात आयुष्य जगत असतात.
या जन्म तारखेचे लोक अतिशय मनमिळावू स्वभावाचे असतात. कोणत्याही लोकांसोबत पटकन मैत्री करतात. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा असतो. अशा लोकांना अडचणींच्या काळात अनेक मित्र धावून येतात. त्यामुळे फारशी आर्थिक चणचण भासत नाही. अशा लोकांना सुरुवातीच्या काळात थोडासा त्रास होतो. परंतु एका ठराविक वेळेनंतर यांचे नशीब असे पालटते की पाहणाऱ्यांना आश्चर्य वाट्ते. अशा लोकांना आयुष्यात अनेक मार्गाने धनलाभ होत असतो. शिवाय त्यांच्याकडे गुंतवणूक केलेल्या जमीनी भरपूर असतात. त्यामुळे असे लोक सतत फायद्यात असतात. हातात सतत पैसा खेळत असल्याने त्यांना मानसिक स्थैर्य लाभते.
विशेष म्हणजे या लोकांच्या मनमिळावू स्वभावामुळे लोक त्यांच्याकडे आपोआप आकर्षित होतात. कोणत्याही परिस्थितीत त्यांना मैत्री टिकवणे शक्य होते. या जन्म तारखेचे लोक स्वतःच्या शर्थींवर आयुष्य जगणे पसंत करतात. हे लोक ऐकून घेतात. मात्र शेवटी स्वतःच्या मनाला रुचेल तेच करतात. त्यामुळे त्यांना स्वतःवर प्रचंड प्रेम आणि आत्मविश्वास असतो. या मूलांकाच्या मुलींना सासरी प्रचंड प्रेम मिळते. तुमच्या प्रति सासरकडून सामंजस्यपणाची वृत्ती राहते. त्यामुळे तुम्हाला उत्तम गृहसौख्य लाभते. तसेच या मूलांकाच्या लोकांना अफाट खर्च करण्याची सवय असते. मात्र हातात सतत पैसा खेळत असल्याने कधीही काही कमी पडत नाही. त्यामुळे या तारखेला जन्मलेल्या लोकांना नशीबवान म्हटले जाते.
संबंधित बातम्या