मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Romantic People : अतिशय रोमँटिक असतात 'या' जन्म तारखेचे लोक! सहजपणे कुणालाही करतात आकर्षित

Romantic People : अतिशय रोमँटिक असतात 'या' जन्म तारखेचे लोक! सहजपणे कुणालाही करतात आकर्षित

Jun 20, 2024 04:15 PM IST

Ank Jyotish About Romantic People : अंकभविष्यात या मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे भविष्य, स्वभाव, करिअर आणि लव्ह लाईफसुद्धा जाणून घेता येते.

जन्मतारखेनुसार रोमँटिक मूलांकाचे लोकं
जन्मतारखेनुसार रोमँटिक मूलांकाचे लोकं

ज्योतिष शास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल जाणून घेण्यासाठी केवळ राशींचाच नव्हे तर मूलांकांचासुद्धा आधार घेतला जातो. अंकभविष्यात या मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे भविष्य, स्वभाव, करिअर आणि प्रेम जीवसुद्धा जाणून घेता येते. अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाला एक विशेष स्थान आहे. प्रत्येक मूलांकानुसार त्या-त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य बदलत असतो. त्यामुळेच प्रत्येक लोक एकमेकांपासून विभक्त स्वभावाचे असतात. वास्तविक मूलांक एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवत असते.

मूलांक म्हणजे काय?

राशीभविष्यात ज्याप्रमाणे राशींना महत्व आहे. त्याप्रमाणेच अंकशास्त्रामध्ये मूलांकांना अतिशय महत्व आहे. परंतु बहुतांश लोकांना मूलांक म्हणजे काय याची अद्याप कल्पना नाही. तर एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक असे संबोधले जाते. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख १८ (कोणत्याही महिन्यातील) असेल तर त्याच्या बेरजेनुसार त्या व्यक्तीचा मूलांक ९ असतो. अंकशास्त्रात १ ते ९ असे एकूण नऊ मूलांक आहेत. या मूलांकाच्या आधारे व्यक्तीच्या स्वभावाबाबत जाणून घेता येते. आज आपण मूलांकाचा आधार घेऊन कोणत्या मूलांकाचे लोक सर्वात जास्त रोमँटिक आणि आकर्षक असतात ते पाहणार आहोत.

कोणत्या मूलांकाचे लोक असतात रोमँटिक?

अंकशास्त्रानुसार, मूलांक ६ चे लोक अतिशय रोमँटिक आणि आकर्षक असतात. कोणत्याही महिन्याच्या ६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. अंकभविष्यानुसार या जन्म तारखेचे लोक अतिशय रोमँटिक असतात. त्यांना आयुष्यात बऱ्याचवेळा प्रेम होते. हे लोक दिसण्यातही आकर्षक आणि सुंदर असतात. त्यामुळे समोरचा व्यक्ती सहजपणे यांच्याकडे आकर्षित होतो. आपल्या दिलखुलास स्वभावामुळे यांना म्हातारपण उशिरा येते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पैसे खर्च करण्यात हे लोक कधीच कंजूसपणा करत नाहीत. अगदी मनमोकळेपणाने हे लोक सर्वांवर खर्च करत असतात. महत्वाचे म्हणजे या लोकांना एखाद्या व्यक्तीजवळ प्रेम व्यक्त करणे कठीण नसते. हे लोक सहजपणे कोणालाही प्रपोज करु शकतात.

मूलांक ६ च्या लोकांना या गोष्टींची आवड असते

मूलांक ६ च्या लोकांना ऐषारामी आयुष्य जगायला आवडते. या लोकांना परफ्युमसारख्या सुगंधित गोष्टी प्रचंड आवडतात. शिवाय महागडी सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्यावर यांचा जोर असतो. त्यांना नेहमीच नीटनेटके राहणे पसंत असते. या लोकांना विविध स्वतःला साजेशा केशरचना करायला आवडतात. या लोकांना कंजूसपणा अजिबात पसंत नसतो. या मूलांकाचे लोक दिलखुलासपणे पैसे खर्च करत असतात. तसेच या लोकांना बाहेर फिरायला जाणे फारच पसंत असते. मूलांक ६ चे लोक आपल्या जोडीदारासोबत नेहमीच रोमँटिक मूडमध्ये असतात. त्यांना नात्यामध्ये प्रेम देणे पसंत असते.

मूलांक ६ चा स्वामी ग्रह

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीनुसार प्रत्येक मूलांकाचासुद्धा एक स्वामी ग्रह असतो. स्वामी ग्रहांचा प्रभाव या मूलांकांवर दिसून येतो. त्यानुसार मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र असतो. शुक्र हा ग्रह सुखसमृद्धी, धनसंपत्ती, प्रेम आणि सौंदर्य यांचे प्रतीक आहे. त्यामुळेच मूलांक ६ च्या लोकांमध्येसुद्धा हेच गुणधर्म आढळतात. रोमँटिक असण्यासोबतच हे लोक आयुष्यात प्रचंड यशस्वी असतात. यांच्याकडे धनसंपत्ती भरपूर असते. त्यामुळेच ते खर्चसुद्धा प्रचंड करतात.

WhatsApp channel