Numerology Horoscope : ज्याप्रमाणे व्यक्तीच्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज राशीचक्रातील राशीवरुन लावता येतो. त्याचप्रमाणे अंकशास्त्रातही मूलांकाना खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, प्रत्येक अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे. तुमचा मूलांक शोधण्यासाठी, तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करून जो मूलांक येईल तो तुमचा मूलांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या १(१+० =१०, १+९=१०, २+८ =१०) असेल. अंकशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील अनेक रंजक गोष्टी जाणून घेता येतात. एखाद्या व्यक्तीची मूलांक संख्या त्याच्या प्रेमाबद्दल आणि विवाहाबद्दल सांगते. तुम्ही लव मॅरेज करणार की अरेंज मॅरेज हे जाणून घ्या.
कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि १८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. प्रेमाच्या बाबतीत ते खूप लाजाळू असतात. ते त्यांच्या भावना कोणाशीही सहज शेअर करू शकत नाहीत, ते त्यांचे प्रेम कधीच व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रेमविवाह जरा कठीण आहे.
कोणत्याही महिन्याच्या २, ११ आणि २० तारखेला जन्मलेले लोक स्वतःच्या इच्छेचे स्वामी असतात. प्रेमाच्या बाबतीत आपण आपल्या मनाने विचार करतात. ते विचारपूर्वक प्रेमात पडतात आणि प्रेमविवाह करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.
कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेले लोक प्रबळ स्वभावाचे असतात. त्यांचा अधिपती ग्रह गुरू आहे. त्यांच्या प्रेमविवाहाची शक्यता अधिक असते.
कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा शासक ग्रह राहू आहे. नात्यात एकापेक्षा जास्त नाती निर्माण होतात असे म्हणतात. प्रेम जीवनात फार गंभीर नसतात. नात्यात एकनिष्ठ नसतात. त्यामुळे फार कमी जण प्रेमविवाह करू शकतात.
महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेले लोक प्रेमासाठी फार भाग्यवान नसतात. याशिवाय, ते कुटुंबातील संस्कृती आणि परंपरांचे पालन करतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संमतीनेच विवाह करतात.
६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा शासक ग्रह शुक्र आहे. प्रेमाच्या बाबतीत ते खूप भाग्यवान असतात. त्यांचा प्रेमविवाहही यशस्वी होतो, पण अनेकदा प्रेमप्रकरणामुळे ते आपला खरा जोडीदार गमावतात.
कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेले लोक खूप लाजाळू आणि संकोच करणारे असतात. या मूलांकाच्या लोकांचा अधिपती ग्रह केतू आहे. त्यांना प्रेमविवाहात रस असतो, पण लग्नाशी संबंधित निर्णय घेताना ते गोंधळलेले असतात.
मूलांक ८ असलेले लोकांचा स्वामी ग्रह शनी असतो. ते नात्यात खूप निष्ठावान असतात. नात्यांसंबंधीचे निर्णय खूप विचारपूर्वक घेतात. ते फारसे प्रेमात पडत नाहीत, परंतु त्यांचे प्रेमविवाह यशस्वी होतात.
मूलांक ९ चे लोक प्रेमाच्या बाबतीत जास्त रस घेत नाहीत. ते प्रेमविवाह टाळतात आणि कुटुंबातील सदस्यांच्या संमतीनेच विवाह करतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)