Numerology Horoscope Mulank 7 : अंकशास्त्रात जन्मांक हा सर्वात महत्वाचा अंक मानला जातो. जन्मांक म्हणजे एखादी व्यक्ति महिन्याच्या ज्या तारखेस जन्मली तिच्यापासून मिळणारा अंक. यालाच मूलांक असेही म्हणतात. व्यक्तिची जी जन्मतारीख असते ती जर एक अंकी असेल, म्हणजे १ ते ९ दरम्यानची असेल तर ती तारीख हाच त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. जर ती तारीख दोन अंकी असेल, म्हणजे १० ते ३१ या तारखांमधील असेल तर त्या तारखेतील अंकाची बेरीज करून तिला एक अंकी बनवले जाते व तो अंक म्हणजे त्या व्यक्तीचा जन्मांक असतो. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख ७ असेल तर तुमचा मूलांक ७ आहे आणि जर तुमची जन्मतारीख १६ असेल तर १+६=७ म्हणजेच तुमचा मूलांक ७ आहे.
अंकशास्त्रात जन्मतारखेला विशेष महत्त्व आहे. जन्मतारखेच्या आधारे माणसाचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान कळते. अंकशास्त्रामध्ये, एखाद्या व्यक्तीचे करिअर, प्रेम जीवन, आर्थिक जीवन आणि आरोग्य यांचे मूल्यमापन जन्म तारखेपासून केले जाते. असे काही लोक असतात ज्यांचे वैवाहिक जीवन खूप तणावपूर्ण असते. कोणकोणत्या लोकांचे वैवाहिक जीवन तणावाने भरलेले असते हे जाणून घ्या.
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला होतो, त्यांचा मूलांक ७ असतो. मूलांक ७ वर केतूचा प्रभाव आहे. असे म्हटले जाते की, या संख्येचे लोक त्यांचे मत व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि काहीवेळा त्यांचे मत स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी नकळत टोकाची भुमीका घेतात. यामुळे वैवाहीक जीवनात परस्पर मतभेद होतात.
मूलांक ७ असलेल्या लोकांवर केतूच्या प्रभावामुळे त्यांचे वैवाहिक जीवन प्रभावित होते. कधीकधी लहान गोष्टी मोठ्या गोष्टी बनतात. काहीवेळा ते आपले विचार उघडपणे मांडत नाहीत, त्यामुळे त्यांना त्यांच्या जोडीदारासोबत मतभेदांना सामोरे जावे लागते.
मूलांक ७ असलेले लोक खूप कमी मित्र बनवतात. या लोकांचे जीवन सुख-सुविधांनी भरलेले आहे. असे म्हणतात की ते हुशार आहेत, ते स्वबळावर पैसे कमवण्यात यशस्वी होतात. त्यामुळे त्यांना क्वचितच आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
मूलांक ७ असलेल्या लोकांचे मूलांक ५ आणि ६ असलेल्या लोकांशी चांगले जमते. असे म्हणतात की हे लोक न्यायाधीश, लेखक, डॉक्टर किंवा ज्योतिषी या क्षेत्रात चांगले काम करतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)