Numerology Prediction About King Mulank : अंकशास्त्रामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व त्याच्या जन्मतारखेवरून शोधू शकतो. अंकशास्त्राच्या माध्यमातून आपण व्यक्तीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल जाणून घेऊ शकतो. ज्याप्रमाणे प्रत्येक नावानुसार एक राशी असते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रात प्रत्येक संख्येनुसार मूलांक असतो आणि राशीचक्रातील राशीप्रमाणे प्रत्येक मूलांक संख्या देखील कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते.
जन्मतारखेच्या अंकाची गणना करून जो क्रमांक मिळतो तो तुमचा मूलांक आहे असे म्हणतात. तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करून एकत्र जोडाल तर त्यानंतर येणाऱ्या क्रमांकाला मूलांक म्हटले जाईल. उदाहरणार्थ, ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. अंकशास्त्रात, मूलांक ६ चा शासक ग्रह शुक्र मानला जातो. यामुळे या राशीच्या व्यक्तीला आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही आणि ते सुख-सुविधांमध्ये जगतात.
कोणत्याही महिन्याच्या ६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. असे मानले जाते की या मूलांकाचे लोक आर्थिक बाबतीत खूप भाग्यवान असतात. ते सुरुवातीपासूनच विलासी जीवन जगतात आणि यांच्या जीवनात चैनीची मुळीच कमतरता नसते. त्यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते.
कोणत्याही महिन्याच्या १५ तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या ६ असते. असे म्हटले जाते की, या तारखेला जन्मलेले लोक विलासी जीवनशैलीचे शौकीन असतात. ते अफाट संपत्तीचे मालक असतात. त्यांना त्यांच्या कारकिर्दीतही मोठे यश मिळते. आर्थिक स्थिती चांगली असते. आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. आनंदी जीवन जगतात.
कोणत्याही महिन्याच्या २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. अंकशास्त्रानुसार त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. साधे आणि नम्र स्वभावाचे असतात. ते त्यांचे मुद्दे मान्य करण्यात पटाईत असतात आणि त्यांच्या सौम्य स्वभावाने सर्वांच्या मनावर राज्य करतात. तसेच, ते आर्थिक बाबतीत खूप भाग्यवान आहेत. त्यांच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते आणि त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक समस्या येत नाहीत.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)