ज्योतिषशास्त्र, समुद्रशास्त्र, स्वप्नशास्त्र याप्रमाणेच अंकशास्त्रालाही महत्व आहे. जन्मतारखेच्या आधारावर तुमचा मूलांक ठरतो. तुमच्या जन्मतारखेच्या गणनेच्या आधारे ठरलेला मूलांक तुमचा स्वभाव, गुण, करिअर, विवाह, प्रेम संबंध याविषयी सांगू शकतो. जाणून घ्या प्रेम आणि विवाह यासंबंधी कोणत्या मूलांकाचे परस्पर संबंध चांगले ठरू शकतात.
अंकशास्त्रानुसार जीवनात संख्यांना विशेष स्थान असते. यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्याविषयी अनेक गोष्टींची माहिती मिळते. आपली जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि घराचा नंबर या सर्वांचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो, यामुळे आपण त्याच्याशी संबंधित गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मूलांकाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख माहित असणे आवश्यक आहे. जर तुमचा जन्म २१ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक ३ आहे, त्याचप्रमाणे जर तुमचा जन्म २५ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक ७ आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा मूलांक जन्मतारखेच्या गणनेच्या आधारावर काढू शकता. येथे आम्ही असे म्हणत नाही की, हे विवाहासाठी सर्वोत्तम जोडपे आहेत, परंतु या अंकांच्या लोकांचे या मूलांकाच्या लोकांशी चांगले संबंध आहे. येथे तुम्ही १ ते ५ पर्यंतच्या प्रेम जीवनासाठी सर्वोत्तम मूलांक कोणता ते पाहू शकतात.
मूलांक १ असलेले लोक मूलांक क्रमांक २, ३, ७ आणि ९ असलेल्या लोकांसाठी अधिक अनुकूल असतील. दोघांच्याही वैयक्तिक आयुष्यात चांगली समज आहे. त्याचप्रमाणे मूलांक २ असलेल्या लोकांची मूलांक संख्या १, ३, ४ आणि ६ असलेल्या लोकांशी चांगली जोडी जमू शकते. हे लोक एकमेकांना चांगले समजून घेऊ शकतात.
मूलांक ३ च्या लोकांचे मूलांक १, २, ५ आणि ७ च्या लोकांशी चांगले जमते. मूलांक ४ असलेल्या लोकांची जोडी मूलांक १, २, ७ आणि ९ च्या लोकांशी चांगली मानली जाते. असे म्हणतात की, या मूलांकाच्या लोकांचे एकमेकांशी चांगले संबंध असतात. मूलांक ५ च्या लोकांसाठी मूलांक ३, ९, १, ६, ७ आणि ८ असलेले लोक सर्वोत्तम ठरतात. यांच्यातील प्रेमसंबंध आणि लग्नसंबंध खास जुळू शकतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)