विवाह ही आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्वाची गोष्ट आहे. दोन व्यक्ती एकत्र येऊन नव्या आयुष्याची सुरुवात करत असतात. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या विवाहाबाबत जाणून घेण्याचे कुतूहल असते. आपले वैवाहिक आयुष्य सुखद असेल की त्रासदायक असेल अशी हुरहूर प्रत्येकाच्या मनात असते. मात्र जोतिषशास्त्रात याबाबत काही अंदाज बांधण्यात आले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन अथवा मूलांकावरुन त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे असणार याबाबत जाणून घेता येते. आज आपण अंकशास्त्राचा वापर करुन प्रत्येक मूलांकाच्या वैवाहिक आयुष्याबाबत जाणून घेणार आहोत.
एखाद्या व्यक्तीचे लग्न कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला झाले असेल. तर त्यांचा मूलांक १ समजला जातो. १ या मूलांकाच्या व्यक्तीचे वैवाहिक आयुष्य चढ-उतारांचे असते. तुमचे सतत जोडीदारासोबत मतभेद होत राहतात.
एखाद्या व्यक्तीचे लग्न कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला झाले असेल. तर तुमचा मूलांक २ समजला जातो. आणि २ या मूलांकाच्या लोकांचे वैवाहिक आयुष्य अतिशय सुखद असते. या जोडप्यात प्रचंड प्रेम असते. हे लोक प्रत्येक परिस्थितीत नेहमीच एकमेकांना पाठिंबा देत असतात.
जर तुमचे लग्न कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला झालेले असते, तर तुमचा मूलांक ३ असतो. ३ मूलांकाच्या लोकांचे वैवाहिक आयुष्य अतिशय शिस्तबद्ध असते. हे लोक एकमेकांचा आदर करतात. आणि त्यामुळे सुखद वैवाहिक आयुष्य जगतात.
अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ४,१३, २२ आणि ३१ तारखेला जर तुमचे लग्न झाले असेल, तर तुमचा मूलांक ४ असतो. या मूलांकाच्या लोकांचे वैवाहिक आयुष्य आनंदी असते. हे लोक आपल्या जोडीदाराकडून छोट्या-छोट्या अपेक्षा ठेवतात. आणि त्या पूर्णसुद्धा होतात.
एखाद्या जोडप्याचे लग्न कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला होते त्यांचा मूलांक ५ असतो. या लोकांचे वैवाहिक आयुष्य सामान्य असते. या जोडप्यामध्ये लहान-मोठे मतभेद होत असतात. मात्र यांच्यामध्ये सामंजस्यपणाने सर्वकाही सुरळीत होते.
जर तुमचे लग्न कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला होते, त्यांचा मूलांक ६ असतो. या मूलांकांचे वैवाहिक आयुष्य नेहमीच मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये सकारत्मकदृष्ट्या चर्चेत असते. आपल्या जोडीदारासोबत हे लोक चांगला वेळ घालवतात. त्यामुळे नात्यात प्रेम पाहायला मिळते.
एखाद्या जोडप्याचे लग्न कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला होते त्यांचा मूलांक ७ असतो. या लोकांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत यशस्वी असते. सामंजस्यपणाने हे लोक प्रत्येक परिस्थितीत एकमेकांवर विश्वास ठेवून वाटचाल करतात.
ज्या लोकांचे लग्न कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला होते त्यांचा मूलांक ८ असतो. या मूलांकाच्या लोकांचे वैवाहिक आयुष्य उत्तम असते. त्यांना एकेमकांची चांगली साथ लाभते.
कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला लग्न झालेल्या लोकांचा मूलांक ९ असतो. या लोकांचे वैवाहिक आयुष्य काहीसे अडचणींचे असते. या जोडप्यामध्ये सतत खटके उडत असतात. मात्र यांचे वाद लगेच मिटतात सुद्धा.
संबंधित बातम्या