Ank Jyotish About Mulank 3 People Life : ज्याप्रमाणे ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य त्याच्या राशीच्या आधारे सांगितले जाते, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे भविष्य त्याच्या जन्मतारखेवरून ओळखले जाते. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांक संख्येच्या स्वतःच्या विशिष्ट गोष्टी असतात, ज्याचा त्याच्याशी संबंधित व्यक्तीवर परिणाम होतो. अंकज्योतिषात १ ते ९ मूलांक असतात. राशीप्रमाणेच या सर्व मूलांकाचा स्वामी ग्रह असतो आणि त्या ग्रहाची त्या विशिष्ट मूलांकावर कृपा राहते.
अंकशास्त्रात मूलांक ३ असलेल्या लोकांबद्दल अनेक गुण सांगितले आहेत. महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. या मूलांकाचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत. बृहस्पति हा सुख, संपत्ती, वैभव, ऐश्वर्य आणि सौंदर्य इत्यादींचा कारक मानला जातो. जाणून घ्या मूलांक ३ शी संबंधित व्यक्तीबद्दल खास गोष्टी-
अंकशास्त्रानुसार, मूलांक ३ असलेल्या लोकांची विचारसरणी सकारात्मक असते. ते स्वतःभोवती सकारात्मक वातावरण देखील तयार करतात. ते जगा आणि जगू द्या यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या प्रियजनांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. ते कधीही त्यांचे ज्ञान स्वतःपुरते मर्यादित ठेवत नाहीत तर ते त्यांचे ज्ञान इतर लोकांशी देखील सामायिक करतात कारण ते सामायिक करण्यावर विश्वास ठेवतात. आपले ज्ञान इतरांना दिल्याने वाढते यामतावर ते विश्वास ठेवतात. ते एकनिष्ठ, विश्वासू आणि सर्व वाईट सवयींपासून दूर राहतात.
असे म्हणतात की मूलांक ३ असलेल्या व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अस्तित्वावर खूश नसतात तेव्हा ते निराश व हताश होतात. त्यांना नेहमी परिपूर्ण भासायचे असते आणि आपल्या सर्वांना माहित आहे की कोणीही परिपूर्ण नाही, परंतु त्यांना हे समजत नाही आणि ते हे सत्य स्वीकारू इच्छित नाही. यामुळे ते अनेकदा न्यूनगंडाचे बळी ठरतात.
मूलांक ३ असलेल्या लोकांचे करिअर आर्थिकदृष्ट्या मजबूत मानले जाते आणि ते नेहमीच त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी कार्यरत असतात. ते चांगले शिक्षक, मार्गदर्शक, समुपदेशक, तत्त्वज्ञ, लेखक आणि प्राध्यापक होऊ शकतात. यामुळे त्यांचा आर्थिक स्तर नेहमी उंचावत जातो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)