मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Ank Jyotish : 'या' जन्म तारखेचे लोक असतात प्रचंड फॅशनेबल! शुक्राच्या कृपेने जगतात ऐषोआरामी आयुष्य

Ank Jyotish : 'या' जन्म तारखेचे लोक असतात प्रचंड फॅशनेबल! शुक्राच्या कृपेने जगतात ऐषोआरामी आयुष्य

Jul 02, 2024 01:46 PM IST

Ank Jyotish About Fashionable People : अंकशास्त्रात मूलांकाच्या आधारे अंकभविष्य सांगितले जाते. प्रत्येक मूलांकाचा एक वेगळा गुणधर्म असतो. मूलांकाचे गुणधर्म त्या-त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात दिसून येतात.

या जन्मतारखेचे लोकं असतात फॅशनेबल
या जन्मतारखेचे लोकं असतात फॅशनेबल

अंकशास्त्रात प्रत्येक अंकाला एक विशेष महत्व प्राप्त आहे. अंकशास्त्रात मूलांकाच्या आधारे अंकभविष्य सांगितले जाते. प्रत्येक मूलांकाचा एक वेगळा गुणधर्म असतो. मूलांकाचे गुणधर्म त्या-त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात दिसून येतात. अनेकांना मूलांक म्हणजे काय याबाबत अद्याप कल्पना नाही. तर एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक म्हणून संबोधले जाते. अंकशास्त्रात १ ते ९ असे एकूण ९ मूलांक असतात. या नऊ मूलांकाच्या आधारे फक्त भविष्यच समजत नाही, तर त्या व्यक्तीचा स्वभाव, आवडी-निवडी, गुणदोष याबाबत जाणून घेण्यास मदत मिळते.

अंक शास्त्रानुसार प्रत्येक मूलांक एका विशिष्ट गुणधर्माचे प्रतिनिधित्व करत असते. शिवाय प्रत्येक मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो. जो या मूलांकावर आपला प्रभाव टाकत असतो. आज आपण अशाच एका मूलांकाबाबत जाणून घेणार आहोत. ज्या मूलांकाचे लोक अतिशय फॅशनेबल आणि आकर्षक असतात. शिवाय या मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्याने हे लोक आयुष्यात अतिशत सुखी असतात. आणि ऐषारामी आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असतो. आपण ज्या मूलांकाबाबत पाहणार आहोत तो मूलांक म्हणजे ६ होय. पाहूया या मूलांकाचे लोक नेमके कसे असतात.

अंकशास्त्रानुसार मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र हा भौतिक सुखांसाठी कारक ग्रह मानला जातो. शुक्र सुखसमृद्धी, धनसंपत्ती, सौंदर्य आणि विलासिनता या गुणांचे प्रतिनिधित्व करते. शुक्राच्या प्रभावामुळेच मूलांक ६ चे लोक चैनीच्या वस्तूंकडे जास्त आकर्षित होतात. या मूलांकाच्या लोकांचा स्वभाव अतिशय खोडकर, हसतमुख,आकर्षक असतो. त्यामुळेच हे लोक क्षणार्धात एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करुन घेऊ शकतात. या मूलांकाच्या लोकांना नेहमीच लोकांच्या केंद्रस्थानी राहायला आवडते. अर्थातच त्यांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायला आवडतं. शिवाय हे लोक फार काळ एकाच एका ठिकाणी राहू शकत नाहीत.

ज्योतिषअभ्यासानुसार मूलांक ६ चे लोक प्रचंड फॅशनेबल असतात. या लोकांना फॅशन आणि ट्रेंडची प्रचंड माहिती असते. आपल्या फॅशनेबल व्यक्तिमत्वानेच हे लोकांच्यात उठून दिसतात. लोक अगदी सहजरित्या यांच्याकडे आकर्षित होतात. या लोकांना नेहमीच नवनवीन आणि वेगवेगळ्या ट्रेंडचे कपडे परिधान करण्याची आवड असते. हे लोक सतत फॅशनजगताबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने या लोकांना सौंदर्यसुद्धा लाभलेले असते.

कोणत्या व्यक्तींचा मूलांक ६ असतो?

अंकशास्त्रानुसार मूलांकाच्या आधारे अंकभविष्य सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन मिळणाऱ्या अंकाला मूलांक असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख १८ असेल तर त्याच्या बेरजेनुसार त्या व्यक्तीचा मूलांक ९ असतो. याच अंकशास्त्राच्या आधारे कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो.

WhatsApp channel
विभाग