Numerology Prediction : अत्यंत गूढ आणि रहस्यमय स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक! पाहा काय सांगते अंकभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology Prediction : अत्यंत गूढ आणि रहस्यमय स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक! पाहा काय सांगते अंकभविष्य

Numerology Prediction : अत्यंत गूढ आणि रहस्यमय स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक! पाहा काय सांगते अंकभविष्य

HT Marathi Desk HT Marathi
May 31, 2024 11:03 AM IST

Numerology Prediction : अंकभविष्यात प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्या त्या मुलांकचे महत्व, स्वभाव आणि गुणदोष सांगण्यात आले आहेत.

Numerology Prediction : अत्यंत गूढ आणि रहस्यमय स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक! पाहा काय सांगते अंकभविष्य
Numerology Prediction : अत्यंत गूढ आणि रहस्यमय स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक! पाहा काय सांगते अंकभविष्य

अंक शास्त्रात मूलांकाच्या आधारे भविष्य सांगितले जाते. यामध्ये तब्बल ९ मूलांक असतात. हे नऊ मूलांक ९ ग्रहांच्या आधारे कार्य करत असतात. या ग्रहांच्या स्थान बदलांचा परिणाम या मूलांकावर होतो. आणि त्यातून भविष्यचा अंदाज बांधला जातो.अंकभविष्यात प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्या त्या मुलांकचे महत्व, स्वभाव आणि गुणदोष सांगण्यात आले आहेत. प्रत्येक मूलांक वेगवगेळ्या स्वभावगुणांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे त्यांना अंक भविष्यात विशेष महत्व आहे.

अंक भविष्यात सांगितल्याप्रमाणे काही मूलांकाचे लोक अतिशय शुभ आणि नशीबवान असतात. तर काही मूलांकाचे लोक अतिशय गूढ आणि रहस्यमय स्वभावाचे असतात. जोतिष अभ्यासानुसार अंकशास्त्रात अशा काही जन्म तारखा आहेत ज्या अतिशय रहस्यमय आहेत. या जन्म तारखेचे लोक समजून घ्यायला अवघड आणि गूढ विश्वात रमणारे असतात. कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१, ३०(मूलांक ३), ४, १३, २२(मूलांक ४), ८,१७,२६ (मूलांक ८) या तारखेला जन्मलेल्या लोकांचा यामध्ये समावेश होतो. हे लोक अतिशय रहस्यमय असतात.

मूलांक ३

कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१, ३० या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. या लोकांचा स्वामी ग्रह गुरु असतो. मात्र हे लोक आयुष्यात अनेक दुर्घटनांना बळी पडतात. या लोकांना गूढ आयुष्य जगणे पसंत असते. त्यांना जास्त लोकांमध्ये मिसळणे पसंत नसते. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवारसुद्धा लहान असतो. हे लोक प्रचंड हुशार आणि कलात्मक असतात. मात्र यांना करिअरमध्ये अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे मूलांक ३ च्या लोकांना यशाचा मार्ग कठीण असतो.

मूलांक ४

कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ असतो. मूलांक ४ च्या लोकांना आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. या लोकांना प्रचंड बुद्धिमत्ता आणि कौशल्य असूनदेखील योग्य ती संधी मिळत नाही. या लोकांच्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. यांना स्वतःच यामधून बाहेर पडावे लागते. हे लोकसुद्धा गूढ स्वभावाचे असतात. फारशा लोकांमध्ये वावरणे यांना आवडत नाही.

मूलांक ८

कोणत्याही महिन्याच्या ८,१७,२६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा स्वभाव अतिशय गूढ आणि रहस्यमय असतो. या मूलांकाचे लोक सतत लहानसहान कारणांनी आजारी पडतात. या लोकांना जवळच्या माणसांकडून दगाफटका होतो. त्यामुळे त्यांना सहजासहजी लोकांना जवळ करणे शक्य होत नाही. या लोकांना सतत एकांतात राहणे पसंत असते.

Whats_app_banner