राशीभविष्याप्रमाणेच अंकभविष्यातसुद्धा फक्त नशीबच सांगितले जाते नाही. तर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी आणि त्याची गुणवैशिष्ट्येसुद्धा सांगितली जातात. त्यामुळेच ज्योतिषशास्त्रात अंकभविष्याला विशेष स्थान आहे. आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातील विविध अडचणींवर अंकशास्त्राचा सल्ला घेताना दिसून येतो. सर्वसामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीसुद्धा अंकशास्त्रात विश्वास ठेवतात. त्यामुळेच हे कलाकार अंकशास्त्रानुसार आपल्या नावात बदल करतात, गाडीचा नंबर निवडतात, वस्तू खरेदी करतात. अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे एक वेगळे महत्व असते.
अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे एक वेगळे गुणधर्म आहे. या गुणधर्मानुसार हे अंक कार्यरत असतात. अंकशास्त्रात मूलांकाच्या आधारे भविष्याचा अंदाज बांधला जातो. बहुतांश लोकांना मूलांक म्हणजे काय याबाबत माहिती नाही. तर तुमच्या जन्म तारखेच्या बेरजेपासून जो अंक मिळतो त्याला मूलांक असे म्हणतात. उदाहरणार्थ जर तुमची जन्म तारीख १४ असेल, तर त्याच्या बेरजेनुसार तुमचा मूलांक ५ असतो. प्रत्येक मूलांकाचे वेगवेगळे गुणधर्म असतात. याचा प्रभाव त्या त्या मूलांकाच्या लोकांवर पडत असतो. त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती वेगळ्या स्वभावाच्या असतात. आज आपण अशा मूलांकाबाबत जाणून घेणार आहोत ज्याच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असते. शिवाय या लोकांना आयुष्यात प्रचंड यश लाभते.
अंकज्योतिषनुसार शनिदेवाची कृपा असणारा मूलांक म्हणजे ८ होय. ८ या अंकाला शनिदेवाचा अंक असेही म्हटले जाते. त्यामुळेच मूलांक ८ च्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपादृष्टी असते. कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. त्यामुळेच ८ या अंकाचे सर्व गुणधर्म या मूलांकाच्या लोकांमध्ये पाहायला मिळतात. शनिला शिस्त, संयम, कर्म, न्याय, धन यांचा कारक मानले जाते. शनिदेव ज्या मूलांकावर शुभ प्रभाव टाकतात त्यांना या गुणधर्मांचा निश्चित लाभ मिळतो. मूलांक ८ चा स्वामी ग्रहच शनि असल्याने या लोकांना आयुष्यभर शनिदेवाची शुभ कृपादृष्टी लाभते.
मूलांक ८ च्या लोकांवर शनिदेवाचा प्रभाव असल्याने हे लोक अत्यंत न्यायप्रिय आणि शिस्तप्रिय असतात. या लोकांना लाडीलबाडी करून फायदा मिळविणे मंजूर नसते. हे लोक कर्मानुसार फळ प्राप्त होते या युक्तीवर विश्वास ठेऊन कार्य करत असतात. हे लोक प्रचंड मेहनती आणि बुद्धिमान असतात. शिवाय शनि ग्रह सर्वात संथ गतीने गोचर करत असतो, त्यामुळेच या लोकांची प्रगती हळूहळू होते मात्र उल्लेखनिय प्रगती होते. प्रचंड कष्टातून आणि कठीण परिस्थितीतून यश खेचून आणण्याची क्षमता या मूलांकाच्या लोकांमध्ये असते.
प्रचंड मेहनती आणि प्रामाणिक असल्याने या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते. शिवाय शनिदेव प्रसन्न असल्याने हे लोक आयुष्यात प्रचंड पैसा मिळवतात, आणि एखाद्या राजासारखं आयुष्य जगतात. या लोकांना कधीही आर्थिक चणचण भासत नाही. आणि कधी आर्थिक अडचण आलीच तरी त्वरित मार्गसुद्धा सापडतो. या मूलांकाचे लोक भौतिक आणि अध्यात्मिक गोष्टींमध्ये योग्य तो समतोल साधतात. त्यामुळेच ते आयुष्यात प्रत्येक गोष्टीत अतिशय स्पष्ट असतात. शास्त्रानुसार या लोकांनी शनिदेवाची पूजा करावी. शिवाय आपल्या क्षमतेनुसार शनिदेवाशी संबंधित वस्तूंचे दान करावे. त्यासोबतच हनुमानाची पूजाही करावी. असे केल्याने या लोकांवर नेहमीच शनिदेव प्रसन्न राहतात. आणि तुमच्यावर शुभकृपादृष्टी टाकतात.
संबंधित बातम्या