ज्योतिषशास्त्रात राशीभविष्याप्रमाणेच अंकभविष्याला विशेष महत्व आहे. राशिभविष्यात राशी पाहून भविष्याचा अंदाज बांधला जातो. त्याचप्रमाणे अंकभविष्यात मूलांक पाहून भविष्याचा आढावा घेतला जातो. मूलांकावरुन केवळ भविष्यच समजत नाही. तर मूलांकांच्या आधारे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य आणि आवडी-निवडी याबाबतदेखील माहिती मिळते. त्यामुळेच अंकभविष्य अनेकांना खास आहे. यामध्ये मूलांकाला प्रचंड महत्व आहे.
बहुतांश लोकांना मूलांक म्हणजे नेमकं काय याबाबत कल्पना नाही. तर एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक असे संबोधले जाते. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख कोणत्याही महिन्याची १४ तारीख असेल, तर त्याच्या बेरजेनुसार त्याचा मूलांक ५ असतो. अशाप्रकारे अंकशास्त्रात १ ते ९ असे एकूण ९ मूलांक असतात. प्रत्यके मूलांकाचा एक स्वामी ग्रह असतो. त्या ग्रहांच्या वैशिष्ट्यांचा प्रभाव या मूलांकावर पडत असतो. त्यामुळंच प्रत्येक मूलांकाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. आज आपण एका अशा मूलांकाबाबत जाणून घेणार आहोत ज्याच्यावर नेहमीच केतूची कृपादृष्टी असते. आणि ते लोक माणसांची पारख करण्यात पटाईत असतात.
अंकशास्त्रानुसार ७ या मूलांकाचे लोक माणसे ओळखण्यात खूप चांगले असतात. ७ या मूलांकाचा स्वामी ग्रह केतू आहे. त्यामुळेच या मूलांकाच्या लोकांवर नेहमीच केतूची कृपादृष्टी असते. केतू या मूलांकाच्या लोकांवर नेहमीच प्रभाव टाकत असतो. त्यामुळेच या लोकांमध्ये कटाक्ष नजरेचा एक खास गुण असतो. त्याच्या आधारे हे लोक पाहताचक्षणी एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकतात. या मुलांकचे लोक माणसे ओळखण्यात कधीच चुकत नाहीत. त्यामुळे ते आयुष्यात अगदी निवडक लोकांच्यात राहत असतात. त्यांचा इतरांवर फारसा विश्वास नसतो.
अंकशास्त्रानुसार मूलांक ७ चे लोक एक उत्तम संशोधक असतात. या लोकांना प्रत्येक गोष्टीबाबत जाणून घेण्याचे कुतुहूल असते. त्यामुळेच ते प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणून विचार करतात. शिवाय त्या गोष्टीबाबत जाणून घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आणि हाच स्वभाव कधीकधी त्यांच्यासाठी त्रासदायकसुद्धा ठरतो. चिकित्सक वृत्तीमुळे बऱ्याचवेळा ते अडचणीत सापडतात. संशोसाधन वृत्तीतून काही साध्य न झाल्यास या लोकांना पटकन निराशा येते. त्यामुळे ते लहान-लहान गोष्टींवरून उदास होतात.
मूलांक ७ चे लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांशी फारसे कनेक्टेड नसतात. या लोकांना आपल्या मनातील भावना व्यक्त करणे आवडत नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा हे लोक गोष्टी आपल्या मनात दाबून ठेवतात. या लोकांना लोकांमध्ये मिसळणे पसंत नसते. त्यामुळेच हे लोक बहुतांशवेळी एकटे राहणे पसंत करतात. मात्र ज्या लोकांशी कनेक्ट होतात त्यांना प्रचंड प्रेम आणि आदर देतात. हे लोक विश्वासार्ह असतात.
संबंधित बातम्या