Numerology Prediction : 'या' जन्म तारखेच्या लोकांवर नेहमीच असते लक्ष्मी कृपा! आयुष्यभर कमी पडत नाही पैसा
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology Prediction : 'या' जन्म तारखेच्या लोकांवर नेहमीच असते लक्ष्मी कृपा! आयुष्यभर कमी पडत नाही पैसा

Numerology Prediction : 'या' जन्म तारखेच्या लोकांवर नेहमीच असते लक्ष्मी कृपा! आयुष्यभर कमी पडत नाही पैसा

Jun 13, 2024 12:06 PM IST

Numerology Prediction : एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन त्याचा स्वभाव, गुणदोष, व्यवसाय, प्रेम जीवन, वैवाहिक आयुष्य याबाबत जाणून घेता येते.

अंकशास्त्र, अंकज्योतिष
अंकशास्त्र, अंकज्योतिष

वैदिक शास्त्रात अंकज्योतिषाला प्रचंड महत्व आहे. बहुतांश लोक आपल्या दिवसाची सुरुवात अंकशास्त्राचा आधार घेऊन करतात. अंकशास्त्र केवळ भविष्यच सूचित करत नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरुन त्याचा स्वभाव, गुणदोष, व्यवसाय, लव्ह लाईफ, वैवाहिक आयुष्य याबाबतसुद्धा अंदाज व्यक्त करतो.

अंकशास्त्रात मूलांकावरुन भविष्य सांगितले जाते. आपल्या जन्मतारखेच्या बेरजेवरुन मिळणाऱ्या अंकाला मूलांक म्हटले जाते. प्रत्येक मूलांकावर ग्रह-नक्षत्रांचा प्रभाव असतो. आणि त्यावरुनच व्यक्तीचा स्वभाव ठरत असतो. आज आपण अशा एका मूलांकाबाबत जाणून घेणार आहोत ज्यावर नेहमीच देवी लक्ष्मीची कृपादृष्टी असते. आणि त्यामुळेच त्यांना आयुष्यात कधीच पैशांची कमतरता भासत नाही.

अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाला एक विशिष्ट महत्व आहे. प्रत्येक मूलांकाचा एक वेगळा गुणधर्म असतो. त्यामुळे त्यात-त्या मुलांकचे लोक वेगळ्या स्वभावाचे असतात. प्रत्येक मूलांकावर ग्रह आणि त्यासंबंधित देवतांचा प्रभाव दिसून येतो. ग्रहांच्या गुणधर्मानुसार त्या व्यक्तींच्या स्वभावात बदल जाणवत असतो. यामध्ये काही मूलांक असे असतात ज्यांच्यावर नेहमीच ग्रह-देवतांचा शुभ प्रभाव असतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता ते उत्तम करिअर सर्वच बाबी अगदी उत्तम असतात.

अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ६ असतो ते लोक अतिशय नशीबवान असतात. या लोकांवर नेहमीच देवी लक्ष्मीची कृपादृष्टी असते. त्यामुळे त्यांना आयुष्यात कधीच आर्थिक चणचण भासत नाही. आणि काहीवेळा आर्थिक समस्या उद्भवलीच तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडतो. ज्या लोकांची जन्म तारीख(कोणत्याही महिन्याची) ६, १५, २४ असते त्यांचा मूलांक ६ असतो. या जन्म तारखेच्या लोकांवर लक्ष्मी नेहमीच प्रसन्न असते. शास्त्रानुसार मूलांक ६ चा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. शुक्र ग्रहाला बुद्धी, न्याय, कला, प्रेम, धन आणि सुख समृद्धीचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे या मूलांकाच्या व्यक्ती वैभवशाली आयुष्य जगत असतात.

मूलांक ६ च्या लोकांचा स्वभाव अत्यंत सौम्य आणि मितभाषी असतो. या लोकांना प्रत्येक व्यक्तीबद्दल आपुलकी आणि काळजी वाटत असते. त्यामुळे या लोकांवर नेहमीच देवी लक्ष्मी खुश असते. त्यांच्या आयुष्यात धनासंबंधी अडचणी आल्या तरी त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी तात्काळ मार्ग मिळतो. या मुलांकाचे इतरांना आनंद देण्यात आपला आनंद मानतात. कार्यक्षेत्रात हे लोक प्रचंड मेहनत घेतात. जिद्दी आणि मेहनती वृत्तीने करिअरमध्ये एक वेगळी उंची गाठण्यात हे लोक यशस्वी होतात. स्वतःच्या कष्टाने पैसे मिळविणे यांना पसंत असते. त्यामुळेच त्यांची चांगली आर्थिक प्रगती होते. आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणीला या जन्म तारखेचे लोक अगदी धैर्याने तोंड देतात. आणि त्यामुळेच यश यांच्या पदरात पडते.

Whats_app_banner