वैदिक शास्त्रात राशीभविष्याप्रमाणे अंकभविष्यसुद्धा तितकेच महत्वाचे असते. बहुतांश लोक दैनंदिन आयुष्यात कोणतेही कार्य करताना अंकशास्त्राचा आधार घेतात. अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या भविष्यासोबतच त्यांचा स्वभाव, आवडी-निवडी, गुणदोष याबाबतही सांगितले जाते. ज्याप्रकारे राशीभविष्यात राशींवरुन भविष्याचे अंदाज बांधले जातात. त्याचप्रकारे अंकशास्त्रात मूलांकावरून भविष्याचे अंदाज लावले जातात. तुमच्या जन्म तारखेवरुन हा मूलांक ठरत असतो. ग्रहांच्या हालचालींचा प्रभाव मूलांकावरदेखील पडत असतो. काही मूलांकांना त्याचा फायदा होतो, तर काहींना नुकसान. जुलै महिन्यात काही मूलांकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रात त्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अंकशास्त्रात मूलांकावरुन भविष्य सांगितले जाते. बहुतांश लोकांना मूलांक म्हणजे काय याबाबत माहितीच नाही. तर मूलांक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या बेरजेवरुन मिळणारा अंक म्हणजे मूलांक होय. उदाहरणार्थ जर तुमची जन्म तारीख कोणत्याही महिन्याची १४ तारीख असेल तर, त्याच्या बेरजेनुसार तुमचा मूलांक ५ असतो. अशाप्रकारे अंकशास्त्रात एकूण नऊ मूलांक असतात. हे मूलांक प्रत्येक व्यक्तीवर आपला प्रभाव टाकत असतात.
तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९, २८ या तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक १ असतो. मूलांक १ च्या लोकांसाठी जुलै महिना फारसा खास नसेल. या महिन्यात तुम्हाला विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महत्वाच्या कामात अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात मंदी जाणवेल. याकाळात कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. दरम्यान तुमच्यासोबत मानापमानाचे प्रसंग घडू शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा.
कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. ३ मूलांकाच्या लोकांसाठी जुलै महिना काहीसा अडचणींचा असणार आहे. याकाळात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नकारात्मक परिणाम दिसून येतील. परंतु तुम्हाला संयम आणि जिद्द ठेवावी लागेल. तुमच्याजवळ क्षमता असूनदेखील त्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे महत्वाची कामे रेंगाळतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा दबाव जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९, १९ किंवा २७ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक ९ असतो. मूलांक ९ साठीसुद्धा हा महिना खडतर असणार आहे. याकाळात तुम्हाला कामात विविध प्रकारच्या समस्या येतील. कोणतेच कार्य तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. त्यामुळे मनावर काहीसा ताण येईल. कोणतेही कार्य करताना विचारपूर्वक करा. घाईगडबड केल्यास नुकसान होऊ शकते. आर्थिक आवक फारशी चांगली नसेल. त्यामुळे कदाचित आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे.