ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राचीसुद्धा लोकांना तितकीच उत्सुकता लागून असते. आज अंकशास्त्रानुसार शिवयोग जुळून येत आहे. याचा विविध मूलांकावर वेगवेगळा परिणाम दिसून येत आहे. कोणत्या मूलांकात लव्हलाईफ सुलभ होत आहे. तर कोणत्या मूलांकात धनलाभ होत आहे. अंकशास्त्राचा वापर करुन लोकांच्या वैवाहिक, आर्थिक, शैक्षणिक, आणि आरोग्यविषयक बदलांचा अंदाज सांगण्यात येतो. पाहूया १ ते ९ मूलांकाचा आजचा दिवस कसा जाणार.
आजचा दिवस मूलांक १ साठी अनुकूल असेल. आर्थिक फायदा होईल. अचानक धनलाभ होईल. क्रीडा क्षेत्रातील लोकांना त्यांच्या कामासाठी पुरस्कार मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. जोडीदारासोबत रोमँटिक व्हाल. नात्यात प्रेम आणि आदर वाढेल.
शुभ अंक-१२
शुभ रंग- हिरवा
मूलांक २ साठी आजचा दिवस चांगला आहे. मात्र कोणत्याही कार्यात भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा. महत्वाचे काम हाती घेताना बारकाईने लक्ष द्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. नाते अधिक दृढ होईल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. संवादातून विविध बाबींवर चर्चा होईल.
शुभ अंक-१०
शुभ रंग-राखाडी
आजचा दिवस मूलांक ३ साठी अतिशय शुभ असेल. दिवसभर कामात उत्साह राहील. धार्मिक गोष्टींमध्ये दानधर्म करा. तुमच्या येणाऱ्या काळात याचा सकारात्मक फायदा दिसेल. मन प्रसन्न राहील. नवीन गोष्टी करण्यात रस राहील. कामाच्या ठिकाणी सकारत्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांशी गाठीभेटी होतील. व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होईल. एखाद्या महत्वाच्या कामात कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
शुभ अंक-१
शुभ रंग- केसरी
मूलांक ४ साठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमचा दृष्टिकोन थोडासा नकारात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी किंवा घरात नकारात्मक बोलणे टाळण्याचा प्रयत्न करा. अन्यथा याचा तुमच्या कार्यावर विपरीत परिणाम होईल. नकारात्मक संभाषणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण अनुकूल असेल. जोडीदारासोबत उत्तम संवाद साधला जाईल.
शुभ अंक-४
शुभ रंग-लाल
आजचा दिवस मूलांक ५ साठीसुद्धा सामान्य असणार आहे. फारसे विशेष काही जाणवणार नाही. पोटासंबंधी तक्रारी जाणवतील. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत उत्तम संवाद होईल. परंतु तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या विषयावर खटके उडू शकतात. त्यामुळे विशेष काळजी घ्या. कोणत्याही कामात संयम ठेवावा लागेल.
शुभ अंक-८
शुभ रंग- निळा
आजचा दिवस मूलांक ६ साठी अनुकूल आहे. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. व्यवसायात वाढ करण्यासाठी नव्या योजना आखणे फलदायी ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत रंजक गोष्टी करण्यावर द्याल. आज हनुमान चालीसाचे पठण केल्याने चांगला लाभ होईल. जोडीदारासोबत वेळ घालवणे उत्तम राहील.
शुभ अंक-३
शुभ रंग- आकाशी
आजचा दिवस मूलांक ७ साठी प्रतिकूल असेल. कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये मतभेद होतील. तुम्ही तुमचे विचार मनातच लपवून ठेवाल. मन उदास राहील. जोडीदाराची मर्जी राखण्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवा. रागावर नियंत्रण ठेवा.
शुभ अंक-१३
शुभ रंग लाल
मूलांक ८ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस थोडासा निराशाजनक असेल. आज कोणत्याही क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक टाळावे. कुटुंबासोबत वेळ घालवणे फलदायी ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. मुलांची काळजी वाटेल.
शुभ अंक-६
शुभ रंग-लाल
आजचा दिवस मूलांक ९ साठी अनुकूल आहे. तुम्ही मनात ठरवलेली कामे संध्याकाळ पूर्ण होतील. अचानक धनलाभ होईल. बऱ्याच दिवसापासून अडकून असलेला पैसा परत मिळेल. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा योग्य येईल. आजचा दिवस सकारात्मक असेल.
शुभ अंक-५
शुभ रंग- तपकिरी