Numerology horoscope : जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी १६ नोव्हेंबरचा दिवस कसा राहील? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology horoscope : जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी १६ नोव्हेंबरचा दिवस कसा राहील? जाणून घ्या

Numerology horoscope : जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी १६ नोव्हेंबरचा दिवस कसा राहील? जाणून घ्या

Nov 16, 2024 01:00 AM IST

आजचे अंक भविष्य १६ नोव्हेंबर २०२४ : वैदिक शास्त्रामध्ये अंकशास्त्राला विशेष महत्व आहे. तुमच्या जन्मतारखेवरुन दिवस कसा जाणार? फायदा होणार की नुकसान? याबाबत पूर्व कल्पना देण्यात येते. अंकशास्त्रात जन्मतारखेच्या बेरजेवरुन जो अंक मिळतो त्याला मूलांक असे म्हणतात. वाचा तुमचे अंकभविष्य.

अंकभविष्य १६ नोव्हेंबर २०२४
अंकभविष्य १६ नोव्हेंबर २०२४

Numerology Horoscope Today 16 November 2024 : अंकज्योतिषानुसार तुमचा मूलांक शोधण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करू शकता आणि मग येणारा मूलांक तुमचा भाग्यांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या ७, १६ आणि २९ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ७ असेल. जाणून घ्या १-९ मूलांक असणाऱ्यांसाठी १६ नोव्हेंबरचा दिवस कसा राहील. वाचा अंकभविष्य-

मूलांक १

मूलांक १ चा दिवस आज मध्यम राहणार आहे. मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. पैशांच्या बाबतीत सावध गिरी बाळगा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. व्यवसायात वाढ होईल.

मूलांक २

मूलांक २ लोकांचा दिवस आज सामान्य राहणार आहे. निरर्थक गोष्टींमुळे मन विचलित होईल. वडिलांच्या पाठिंब्यामुळे अनेक कामांमध्ये यश मिळू शकते. वाणी आणि वर्तनात सावध गिरी बाळगा. कौटुंबिक जीवन त्रासदायक ठरू शकते. कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात.

मूलांक ३

मूलांक ३ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. सामाजिक कार्यामुळे मान-सन्मान वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करू शकता.

मूलांक ४- 

मूलांक ४ च्या लोकांची तब्येत आज सामान्य राहणार आहे. बाह्य खानपानापासून स्वत:चे रक्षण करा. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आईचे सहकार्य मिळेल. आईची तब्येत सुधारेल. ऑफिसशी संबंधित कामांची माहिती ठेवा. व्यवसायासाठी प्रवास फायदेशीर ठरेल.

मूलांक ५ 

मूलांक ५ च्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. जमीन, इमारत आणि वाहन खरेदी शक्य आहे. काही सुखद बातमी मिळू शकते. काही अडकलेले पैसे येऊ शकतात. सर्व कामांमध्ये यश मिळेल. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो.

मूलांक ६ 

मूलांक ६ च्या लोकांचा भाऊ आणि बहिणीसोबतचे संबंध आज मजबूत होतील. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. अविवाहित व्यक्ती एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मित्रासोबत व्यवसायसंबंधी प्रवास करू शकतात.

मूलांक ७ 

मूलांक ७ चे लोक आज कुटुंबासमवेत धार्मिक सहलीला जाऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांवर कामाचा ताण वाढू शकतो. व्यवसायात व्यस्तता वाढेल. वाहनाच्या देखभालीवर खर्च होणार आहे.

मूलांक ८

मूलांक ८ चा दिवस चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. आयुष्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नाही. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. तुमच्या बोलण्यात गोडवा येईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

मूलांक ९ 

मूलांक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न निश्चित होऊ शकते. कौटुंबिक जीवनात वाढ होईल. आत्मविश्वास उंचावेल. वाहनसुखात वाढ होऊ शकते. नोकरीत पदोन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील. उत्पन्नात वाढ होईल.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner