Numerology Horoscope Today 7 December 2024 : आज, शनिवार ७ डिसेंबर, शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आज शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला तिळाचे तेल अर्पण करा. तसेच आज चंपाषष्टी असुन या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते. जन्मतारखेनुसार जाणून घ्या मूलांक १-९ असणाऱ्यांसाठी ७ डिसेंबरचा दिवस कसा राहील, वाचा अंकभविष्य.
अंक १ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. पण मनातील नकारात्मक विचार टाळले पाहिजेत. अतिउत्साही होणे टाळावे. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करावा. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते.
अंक २ च्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यापाऱ्यांसाठीही आजचा दिवस चांगला राहील. परदेशातून होणारा व्यवसाय समाधानकारक राहील. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.
अंक ३ असलेले लोक आज आनंदी राहतील. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्ट्या चांगली कामगिरी कराल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.
अंक ४ च्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. संभाषणात समतोल राखा. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्राच्या मदतीने व्यवसायाची परिस्थिती सुधारू शकते.
अंक ५ च्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. धीर धरण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक समस्या त्रासदायक ठरू शकतात. आर्थिक दृष्ट्या तुमचा दिवस चांगला जाईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात सुधारणा होईल.
अंक ६ असलेल्या लोकांच्या मनात आज अनेक प्रकारच्या भावना असू शकतात. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होईल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. नफ्यात वाढ होईल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.
आज तुमच्या घरगुती सुखात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. संयम राखण्याचा प्रयत्न करा. फालतू वादविवाद टाळा. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात. आई-वडिलांच्या तब्येतीवर लक्ष ठेवा.
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. नोकरीत पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. वडिलोपार्जित व्यवसाय पुन्हा सुरू करता येईल. वडिलांकडून पैसे मिळू शकतात. आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.
आज अंक ९ च्या व्यवसायाचा विस्तार होईल. आर्थिक लाभाच्या संधी प्राप्त होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. विद्यार्थ्यांचा वेळ चांगला जाईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या