Numerology horoscope Today 29 November 2024 : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही जातकाचे भवितव्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व प्रकट करते. अंकशास्त्रानुसार तुमचे अंक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करून येणारा अंक तुमचा मूलांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या २, ११ आणि २९ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा अंक २ असेल. जाणून घ्या मूलांक १ ते ९ असणाऱ्यांसाठी २९ नोव्हेंबरचा दिवस कसा राहील, वाचा अंकभविष्य..
अंक १ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मान-सन्मान वाढेल. आज तुम्ही प्रभावशाली व्यक्तींना भेटू शकता. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल.
मूलांक २ असणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुखात वाढ होईल. खर्चात वाढ होईल, म्हणून आर्थिक अंदाजपत्रक तयार करा. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल.
अंक ३ च्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. काम करावेसे वाटेल. आर्थिक दृष्ट्या परिस्थिती सुधारेल, परंतु पैशांशी संबंधित बाबतीत सावधगिरी बाळगा.
अंक ४ च्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. रखडलेल्या कामांना यश मिळेल. बोलण्याच्या प्रभावाने लोक प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे चांगले फळ मिळेल. व्यापाऱ्यांना नफा होईल.
अंक ५ असलेल्या लोकांना आज आपल्या कामात यश मिळेल. जमीन, इमारत आणि वाहन खरेदी शक्य आहे. वाहनांचा वापर करताना सावधगिरी बाळगा. नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. कुटुंबासमवेत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता.
अंक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. कुटुंबातील वातावरण थोडे अशांत राहू शकते. नोकरी करणाऱ्यांवर कामाच्या ठिकाणी कामाचा ताण असणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो.
अंक ७ च्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या मदतीने सोडवता येतील.
अंक ८ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. मात्र, आर्थिक बाबींमध्ये घाई करू नका. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. काही जातकांचे लग्नही होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
अंक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी ठरणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत मतभेद होण्याची चिन्हे आहेत. तब्येतीवर लक्ष ठेवा. आर्थिक दृष्ट्या तुमची परिस्थिती सामान्य राहील.
डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.