Numerology horoscope Today 29 December 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करा आणि मग येणारा अंक तुमचा मूलांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या २, ११ आणि २९ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा अंक २ असेल. जाणून घ्या मूलांक १-९ असणाऱ्यांसाठी २९ डिसेंबरचा दिवस कसा राहील.
अंक १ असलेल्या लोकांना ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. शारीरिक सुखांबरोबरच वाहनसुखातही वाढ होऊ शकते. नोकरीत तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात.
अंक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. मनात निराशेची भावना राहील. आर्थिक परिस्थितीबाबतही मनात चढ-उतार राहतील. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या अनुषंगाने प्रवास करावा लागू शकतो.
अंक ३ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या तुम्ही चांगल्या स्थितीत असाल. आरोग्य उत्तम राहील.
अंक ४ असलेल्या लोकांना मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायातून फायदा वाढेल. नोकरीत प्रगती होईल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. अविवाहित जातकांसाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही चांगले राहाल.
अंक ५ च्या व्यापाऱ्यांना काम करावेसे वाटेल. धर्माप्रती आदर वाढेल. मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता. पैसा येईल, परंतू खर्चाचा ही अतिरेक होईल. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यात समतोल राखावा. प्रेम जीवन चांगलं राहील.
अंक ६ असलेल्या लोकांना आज अभ्यास करावासा वाटेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे प्रेमाची वाटचाल लग्नाकडे होऊ शकते.
अंक ७ च्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. नोकरीत बदल झाल्याने जागा बदल होऊ शकते. उत्पन्नात वाढ होईल. कामातील अडथळे दूर होतील. पुण्य आणि ज्ञानाची प्राप्ती होईल. वयोवृद्धांचे आशीर्वाद प्राप्त होतील. व्यवसायाची स्थिती मजबूत राहील.
अंक ८ च्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. संभाषणात समतोल राखा. व्यवसायातून फायदा वाढेल. कुटुंबातील एखाद्या मोठ्याकडून व्यवसायासाठी पैसे मिळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
अंक ९ च्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. खर्चात वाढ होईल. मात्र, पैशांची आवक चांगली राहील. तरीही थोडा काळजीपूर्वक खर्च करावा. व्यावसायिक परिस्थिती आणि प्रेम जीवन पूर्वीपेक्षा चांगले राहील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या