Numerology horoscope Today 28 November 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचे अंक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना केल्यास येणारा नंबर तुमचा मूलांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ५ असेल. जाणून घ्या २८ नोव्हेंबरला १-९ मूलांकाचा दिवस कसा राहील, वाचा अंक राशीभविष्य...
अंक १ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वडिलांच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील एखादा सदस्य चांगली बातमी देऊ शकतो. आज अनावश्यक वादविवाद टाळा. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.
अंक २ च्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. इच्छित परिणाम मिळतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. भावंडांशी संबंध दृढ होतील. व्यवसायात नफा वाढेल. मानसिक तणावातून मुक्ती मिळेल.
मूलांक ३ च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. नशिबाने काही रखडलेली कामे पूर्ण होतील. मुलांचे सहकार्य मिळेल.
अंक ४ च्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. जीवनात सकारात्मक बदल होतील. व्यवसाय करणाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात लाभ होईल. प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल.
अंक ५ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. जीवनशैलीत सकारात्मक बदल होतील. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. भावंडांसोबतच्या आठवणी ताज्या होतील. वादविवादांपासून दूर राहा.
अंक ६ च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. मानसिक ताण तणाव दूर होईल. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता.
अंक ७ च्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फळदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांवर कामाचा ताण अधिक असेल. व्यवसायात वाढीच्या संधी प्राप्त होतील. प्रवासात सावधगिरी बाळगा. अनोळखी व्यक्तींसोबत पैशांच्या बाबतीत सावध गिरी बाळगा.
अंक ८ असलेल्या लोकांच्या भौतिक सुखात वाढ होईल. मानसिक ताण तणाव दूर होईल. धनहानी होण्याची शक्यता आहेत, त्यामुळे आर्थिक बाबी काळजीपूर्वक हाताळा. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्याविरोधात षडयंत्र रचू शकतो.
अंक ९ असलेले लोक आज नवीन लोकांना भेटतील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात तुम्हाला काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. धार्मिक कार्यात रस घ्याल. भावंडांना ही आर्थिक मदत करावी लागू शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)