Numerology Horoscope : उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा,जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचे अंक भविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Numerology Horoscope : उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा,जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचे अंक भविष्य

Numerology Horoscope : उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा,जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचे अंक भविष्य

Dec 25, 2024 01:30 AM IST

आजचे अंक भविष्य २५ डिसेंबर २०२४ : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही जातकाचे भवितव्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व प्रकट करते. जन्मतारखेनुसार चला जाणून घेऊया सोमवार २३ डिसेंबरचा तुमचा दिवस कसा राहील..

अंक भविष्य
अंक भविष्य

Numerology horoscope Today 25 December 2024 : अंकज्योतिषानुसार तुमचा मूलांक जाणून घेण्यासाठी तुमची जन्मतारीख, महिना आणि वर्ष यांची गणना करा आणि मग येणारा अंक तुमचा भाग्यांक असेल. उदाहरणार्थ, महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा अंक ५ असेल. जन्मतारखेनुसार चला जाणून घेऊया सोमवार २५ डिसेंबरचा तुमचा दिवस कसा राहील.

मूलांक १ - 

मूलांक १ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या बोलण्याने सर्वांना प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बोलण्यात गोडवा राहील. खूप आत्मविश्वास असेल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल.

मूलांक २ - 

मूलांक २ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. आर्थिक दृष्ट्या चांगला दिवस आहे. मुलांकडून सहकार्य मिळेल. प्रवासात फायदा होईल.

मूलांक ३ - 

मूलांक ३ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. मनात चढ-उतार असतील. व्यवसाय विस्तारात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या संदर्भात तुम्ही इतर ठिकाणीही जाऊ शकता. आर्थिक स्थिती सामान्य राहील.

मूलांक ४ - 

मूलांक ४ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. घरात सणासुदीचे वातावरण राहील. मन प्रसन्न राहील. अनावश्यक राग आणि वाद टाळा. मित्रांकडून सहकार्य मिळेल. तुमच्या कामात तुम्हाला सन्मान मिळू शकतो.

मूलांक ५ - 

मूलांक ५ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आत्मविश्वासाने सन्मान वाढेल. व्यवसायात वाढ होईल. मित्राच्या मदतीने लाभाच्या संधीही मिळू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

मूलांक ६ - 

मूलांक ६ असलेल्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. आज तुम्ही एखाद्या वरिष्ठ व्यक्तीशी संपर्क साधू शकता जो तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत करेल. आज तुम्ही पैसे कमवण्याच्या खूप प्रभावी मार्गांचा विचार करू शकता. आज तुम्ही शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करू शकता.

मूलांक ७ - 

मूलांक ७ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फळदायी असणार आहे. आत्मविश्वासाचा अभाव राहील. भूतकाळातील गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. जमीन, इमारत आणि वाहन खरेदी शक्य आहे, परंतु अडथळे येतील.

मूलांक ८ - 

मूलांक ८ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस विविध संधींनी भरलेला असणार आहे. वाणीचा प्रभाव वाढेल. कौटुंबिक व्यवसाय सुरू होऊ शकतो. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध आणि आरोग्य सुधारेल. नोकरीत उत्पन्न वाढीसोबत प्रमोशन मिळू शकते.

मूलांक ९ - 

मूलांक ९ असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणार आहे. काही प्रलंबित पैसे वसूल होऊ शकतात. मात्र, वाहनांच्या देखभालीवर खर्च वाढेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील, जुन्या स्रोतातूनही पैसा येईल. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner